'मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी याठिकाणी आलो. रक्षा खडसे माझी सून नाही तर मुलगी आहे, मात्र मी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो, अधिकाधिक मतांनी दोघी निवडून याव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे भाजपचा प्रचार करायला मोकळा आहे. रक्षा खडसेंचा उमेदवारी फॉर्म भरायला उपस्थित राहिलो नाही, कारण अजूनही माझा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. ', असं एकनाथ खडसे म्हणाले.
advertisement
महाराष्ट्र भाजपचं स्पष्टीकरण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'राज्यातल्या समितीला एकनाथ खडसेंबद्दल किंतू परंतू नाही, खडसेंबद्दलचा निर्णय केंद्रीय समिती करेल,' असं बावनकुळे म्हणाले.
दुसरीकडे गिरीश महाजनांनीही खडसेंच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे. 'खडसे साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी मी फक्त पंतप्रधान, अमित शाह आणि नड्डा यांच्याशीच बोलतो खालच्यांशी कुणाशी बोलत नाही, असं सांगितलं आहे, त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही,' अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे.
