नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवर तरुणाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल दुपारी अडीचच्या सुमारास परिसरात असलेल्या हिंद सोसायटी येथे आपला मित्राला चहाच्या टपरीवर भेटण्यास आला होता. त्यावेळी या ठिकाणी संशयित गिरीश शिंगोटे हा आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत चार चाकी गाडीत तरुणाला मारहाण करत मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून नेत होते. यावेळी त्र्यंबकरोड जवळील एका खाजगी हॉस्पिटल जवळ संधी मिळताच तरुणाने अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून, गाडीतून पळ काढून पपया नर्सरी पोलीस चौकी येथे गेला, त्यामुळे त्याची सुटका झाली.
advertisement
बायकोच्या प्रियकराने टपरीवरून उचललं
दरम्यान, यावेळी काही लोकांनी तरुणाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ काढला होता. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला असून, याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून गिरीश शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवरसह त्याच्या मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून प्रेम प्रकरणातून हे प्रकरण घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रेम प्रकरणातून अपहरण
हे संपूर्ण प्रकरण प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र ज्या तरुणाचे अपहरण केले जात होते त्या तरुणाच्या पत्नीचं आणि अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीचे लग्ना अगोदरचे प्रेम संबंध होते आणि प्रेमासाठी अडथळे ठरत असल्याच्या कारणातून या तरुणाचा अपहरण केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
हे ही वाचा :