सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली म्हणजे निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेले ठिकाण आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटातील जैवविविधतेचा प्रमुख हॉटस्पॉट म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. अशा या आंबोली परिसरात प्रत्येक ऋतूत निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते.
सध्या आंबोली चौकुळ परिसरात विविध रंगांच्या रानफुलांचा बहर आला आहे. त्यामुळे आंबोली परिसरात रानफुलांचा मनमोहक सुगंधाने दरवळत आहे. यातील काही निवडक प्रजातींची रानफुले अल्प कालावधीकरिता म्हणजे विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत केवळ आंबोली परिसरातच आढळून येतात.
advertisement
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
जमिनीवर जणू फुलांच्या गालीचा पसरावा असे नयनरम्य दृश्य या कालावधीत असते. या रान फुलांचा हा नयनरम्य नजारा व नैसर्गिक सुगंध अनुभवता येतो. याबरोबरच या रान फुलांकडे आकर्षित होणारे विविध प्रकारचे कीटक व पक्षीही या कालावधीत पहावयास मिळतात.
Gila Vada Recipe : अमरावतीमधील स्पेशल ‘गिला वडा’ कसा फेमस झाला? त्याची रेसिपी काय?, VIDEO
कोणती फुले याठिकाणी पाहायला मिळतात -
या रानफुलामध्ये दुर्मिळ समजली जाणारी टोपली कारवी, सोनारडी, तिरडे, नागफूले, तपकी, सांगाडी, पेवची पांढरी फुले, नागफूल, देवकेळ, कार्टोला, रानगुलाब अशी स्थानिक जातीची रंजक नावाची ओळखली जाणारी रानफुले आढळून येतात.