युनिफॉर्म, बॅज सगळं मिळालं
दौलताबाद पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरूवात केली तेव्हा महिलेजवळ अशा गोष्टी मिळाल्या ज्यामुळे तिचं पितळ उघडं पडलं. पोलिसांना महिलेच्या घरातून लष्कराचा युनिफॉर्म, पॅरा लिहिलेला बॅज आणि तीन स्टार असलेलं चिन्ह मिळालं आहे. हे तेच स्टार आहेत जे लष्करामध्ये रँक दाखवण्यासाठी वापरले जातात. एवढच नाही तर पोलिसांना महिलेच्या घरातून एक नेमप्लेटही सापडली आहे, ज्यावर कॅप्टन रुचिका जैन, असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं.
advertisement
अवॉर्ड, मेडल आणि खोटी प्रतिष्ठा
महिलेने स्वत:ला आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमांच्या आमंत्रण पत्रिकांमध्ये महिलेचं नाव कॅप्टन म्हणून छापलं जायचं. महिलेच्या घरातून चार मेडल, अनेक अवॉर्ड, मेमेंटो आणि आमंत्रण पत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. एवढच नाही तर महिलेचे लष्कराची वर्दी घालून काढलेले फोटोही सापडले आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून ही महिला समाजामध्ये बोगस कॅप्टन बनून मिरवत होती आणि लोकांना फसवत होती.
हत्यारही केलं जप्त
पोलिसांना महिलेच्या घरातून फक्त मेडल आणि अवॉर्डच नाही, तर हत्यारही सापडलं आहे, ज्यात एक एअर पिस्टल आणि एका एअर गनचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पिस्टलवर 'नो लायसन्स रिक्वायर्ड' असं लिहिलं आहे. या हत्यारांचा वापर कुठे आणि कसा केला गेला? तसंच महिलेकडे ही हत्यारं कशी आली? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या दौलताबाद पोलिसांनी रुचिका जैनला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुचिका जैनने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.