TRENDING:

यवतमाळमध्ये सायबर फ्रॉड, दीड हजार लोक वस्तीच्या गावात २७ हजार जन्माच्या नोंदी, प्रशासन हादरले

Last Updated:

आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीत सी.आर.एस. सॉफ्टवेअरला जन्माच्या 27 हजार 397 नोंदी आणि मृत्यूच्या 7 नोंदी आढळून आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भास्कर मेहेरे, प्रतिनिधी, यवतमाळ: यवतमाळमध्ये मोठा सायबर फ्रॉड समोर आला असून दीड हजार लोक वस्तीच्या गावात 27 हजार जन्माच्या नोंदी आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेत प्रशासनाने त्वरीत चौकशीला सुरुवात केली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद
यवतमाळ जिल्हा परिषद
advertisement

आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीत सी.आर.एस. सॉफ्टवेअरला जन्माच्या 27 हजार 397 नोंदी आणि मृत्यूच्या 7 नोंदी आढळून आल्या आहेत. सेंदूरसनी या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे दीड हजार असताना या गावामध्ये एवढ्या जन्म मृत्यू नोंदी आढळल्याने प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे.

ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत केली. त्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत त्वरीत चौकशी केली. या नोंदी ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचायत मार्फत शक्य नसल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरण हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांना अवगत करुन दिले. त्यांच्या मार्फत राज्य लॉगीन वरुन तपासणी केली असता शेंदुरसनी या ग्रामपंचायतीचा सी.आर.एस. आयडी मुंबई येथे मॅप असल्याचे दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. तसेच सदर प्रकरणाची तपासणी दिल्ली येथील भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले.

advertisement

सदर नोंदीच्या तांत्रिक तपासाअंती या नोंदी सायबर फ्रॉड अंतर्गत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली वर्तविण्यात आली. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शहर पोलिस स्टेशन यवतमाळ येथे गुन्हा दाखल केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांनो, आता शेतात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, दुप्पटीने वाढेल उत्पन्न
सर्व पहा

जिल्ह्यातील सर्व निबंधक जन्म-मृत्यू यांना आपला जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठीचा सी.आर.एस. आयडी, पासवर्ड व ओटीपी इतर कुणाला देऊ नये व काही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरावत अवगत करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू यवतमाळ यांनी केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यवतमाळमध्ये सायबर फ्रॉड, दीड हजार लोक वस्तीच्या गावात २७ हजार जन्माच्या नोंदी, प्रशासन हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल