रोटावेटरमध्ये अडकून डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. शेतात रोटर चालवत असताना ड्रायव्हरचा मागील बाजूला तोल गेला. यामुळे विजय बाविस्कर हे रोटरमध्ये अडकले. क्षणातच त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
होर्डिंग कोसळून अपघात -
दरम्यान सोमवारी मुंबईतूनही धक्कादायक घटना समोर आली. घाटकोपर येथे भलंमोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 44 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेनंतर आता संबंधित होर्डिंगबाबात धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंगची नोंद थेट ‘लिम्का बुक रिकोर्ड’मध्ये झालेली होती. बईतील सर्वात मोठं होर्डिंग अशी नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये झालेली आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे.
