साथीदारासोबत रचली चोरीची योजना
नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींची नावे सरफराज सलीम शेख आणि अरबाज अहमद रईस अहमद अशी आहेत. त्यातील एका आरोपीला आपल्या टकलेपणावर उपचार घ्यायचे होते, पण त्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या मित्रासोबत वाहनचोरी करण्याचा कट रचला. त्यांनी शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.
advertisement
शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले, ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम
असा लागला पोलिसांना सुगावा
क्राईम ब्रँचची टीम लकडगंज परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, अरबाज अहमद चोरीची दुचाकी विकण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याने सांगितले की, तो काही काळापासून टकलेपणावर उपचार घेण्याचा विचार करत होता. डॉक्टरांनी त्याला खास ट्रीटमेंट सुचवली होती, पण ती खूप महागडी होती. आर्थिक अडचणीमुळे त्याने वाहन चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मित्रासोबत मिळून नागपुरातील विविध ठिकाणांहून सहा दुचाकी चोरी केल्या.
कुटुंबाचे पैसे बुडाले,1 हजार 760 कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा
पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या टोळीत आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, आरोपी यापूर्वी अशा गुन्ह्यात सामील होते का, हेही तपासले जात आहे.