बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला प्रारंभ केला. या प्रचारात युगेंद्र पवार यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांचे मनोधैर्य वाढवले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्या वक्तव्याप्रकरणी सुनावले.
दादांचे ते वक्तव्य चुकीचेच
मत देणे हा तुमचा अधिकार आहे. मत दिले तर ठीक, नाहीतर मी अर्थ मंत्री आहेत. कुणाला कुठे किती निधी द्यायचा हा माझा अधिकार आहे, तुम्ही काट मारली तर मी ही काट मारेन, असे असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता युगेंद्र पवार यांनीही काकांचे वक्तव्य चुकीचेच असल्याचे म्हटले आहे.
advertisement
पवार साहेबांची ही शिकवण नाही, पुतण्याने काकाला ठणकावले
अजित पवार यांचे विधान चुकीचे आहे. मला त्यांच्यावर फार काही बोलायचे नाही. मी सहसा त्यांच्याबरोबर बोलणं टाळतो. परंतु हे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. कारण तो निधी जनतेचा, लोकांच्या कराचा पैसा असतो. लोक आपल्याला निवडून देत असतात, त्यामुळे आपण पदावर बसत असतो. पवार साहेबांची ही शिकवण नाही, मला तरी त्यांचे विधान अजिबात पटलेले नाही, अशा शब्दात युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
त्या वक्तव्यावर अजित पवारांचे नो कमेंट्स
शनिवारी औसा येथील भुईकोट किल्ल्याच्या परिसरात झालेल्या जाहीर सभेत अजित पवार म्हणाले की, मी माझी भूमिका मांडतो. विरोधकांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपाला मी प्रत्युत्तर उत्तर देत नाही. मी विकास कामाला महत्त्व देतो.
