डावखुऱ्या फलंजाजी आणि गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणून सोडणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराज सिंह याची ओळख आहे. सामना एकहाती फिरवण्याची क्षमता त्याच्यात होती. २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अगदी कॅन्सरची लागण झालेली असतानाही त्याने देशासाठी खेळणे पसंत केले. केवळ खेळलाच नाही तर आपल्या बहारदार कामगिरीने भारताला विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर दीड-दोन वर्ष त्याने गंभीर आजाराचा सामना केला. नंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले खरे परंतु काही वर्षातच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. माजी टेनिसपटू सानिया मिर्जा हिला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने निवृत्तीच्या प्रश्नावर धक्कादायक गौप्यस्फोट केला.
advertisement
मला आदर मिळत नव्हता
"मला माझ्या खेळाचा आनंद मिळत नव्हता. माझ्या मनात हा प्रश्न सारखा येत होता की जर मी क्रिकेट खेळून मला खुशी मिळत नव्हती, तर मी ते का खेळतोय? मला असे वाटत होते की मला संघाकडून कोणताही पाठिंबा मिळत नव्हता किंवा आदर मिळत नाही. दोन्ही गोष्टी मिळत नव्हत्या तर खेळण्यात काय अर्थ होता? मी स्वतःला विचारत राहिलो, मी काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो? मी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या जास्त सहन करू शकत नव्हतो आणि ते मला त्रास देत होते. म्हणूनच मी निवृत्तीचा निर्णय घेतला, असे युवराज सिंह म्हणाला.
टीकाकारांना उत्तर देताना युवराज सिंह म्हणाला, "आता, जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की त्या माणसांकडे पाहण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. कदाचित ते माझ्या वडिलांशी चांगले वागत असेल. तो व्यक्ती त्यावेळी स्वतः भारतासाठी खेळत होता. मी त्यावेळी केवळ १३-१४ वर्षांचा होतो. मी फार वाईट वाटून घेतले नसते परंतु माझ्या वडिलांनी त्यांचे म्हणणे फार गांभीर्याने घेतले.
युवराज सिंह याची क्रिकेट कारकीर्द
युवराज सिंह हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होता. कोणताही सामना एकहाती फिरविण्याची ताकद त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत होती. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत युवराजने दमदार कामगिरी केली होती. ३०४ एकदिवसीय सामन्यात त्याने ८७०१ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने १४ शतके आणि ५२ अर्धशतके झळकावली, क्रमांक ५-६ वर खेळताना एवढी शतके आणि अर्धशतके करणे सोपे नसते, परंतु युवराजच्या असाधारण प्रतिभेने ते शक्य करून दाखवले.
