TRENDING:

ZP Election:...म्हणून झेडपी निवडणुकीची मतदान आणि मतमोजणीची तारीख बदलली, उमेदवारांनाही नवी 'डेडलाईन'

Last Updated:

5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्याानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला होता. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत येत असताना विमान अपघातात निधन झालं. अजितदादांच्या निधनामुळे राज्यातील ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल केला आहे.
News18
News18
advertisement

राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समिता निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. अर्ज मागे घेण्याची मुदत ही २२ जानेवारी होती. अर्ज मागे घेतल्यामुळे आता मैदानात असलेल्या उमेदवाराची नाव स्पष्ट झाली आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुले  सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.  5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

advertisement

असा आहे निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल

निवडणूक प् आधीची तारीख सुधारित तारीख
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे 12 जानेवारी 2026 12 जानेवारी 2026
नामनिर्देशन पत्रे भरण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2026 19 जानेवारी 2026
नामनिर्देशन पत्रांची छाननी 20 जानेवारी 2026 20 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 22 जानेवारी 2026 22 जानेवारी 2026
प्रचाराची सांगता 03 फेब्रुवारी 2026 05 फेब्रुवारी 2026
मतदानाचा दिनांक 07 फेब्रुवारी २०२६ 07 फेब्रुवारी 2026
मतमोजणी 07 फेब्रुवारी २०२६ 09 फेब्रुवारी 2026
निकाल जाहीर होणार 07 फेब्रुवारी २०२६ 09 फेब्रुवारी 2026

advertisement

आता प्रचाराला मिळाले आणखी २ दिवस

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमामुळे आता उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.  आतापर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. आता मतदानाची सांगता ही ३ फेब्रुवारी रोजी होणार होती, आता ५ फेब्रुवारी रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. उमेदवारांना आता प्रचारासाठी २ दिवस शिल्लक मिळाले आहे.

advertisement

अजितदादांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये  अपघाती निधन झालं. राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील.

advertisement

निकाल कधी लागणार? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात असं मंदिर तुम्ही पाहिलं नसेल! पर्यटकांचं ठरतंय नवं आकर्षण, हे आहे लोकेशन
सर्व पहा

आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election:...म्हणून झेडपी निवडणुकीची मतदान आणि मतमोजणीची तारीख बदलली, उमेदवारांनाही नवी 'डेडलाईन'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल