गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदाच्या निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागली होती. दोन ते अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेलल्या होत्या. आरक्षणाामुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता . हायकोर्टाच्या निर्णयानंतर या संपूर्ण प्रक्रियेला वेग आला होता. ग्रामविकास विभागाने आरक्षणाबाबत जाहीर केले. आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.
advertisement
जिल्हानिहाय आरक्षण :
- ठाणे- सर्वसाधारण महिला
- पालघर - अनिसूचत जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग- सर्वसाधारण
- नाशिक- सर्वसाधारण
- धुळे - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदुरबार- अनुसूचित जमाती
- जळगाव- सर्वसाधारण
- सातारा - नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- अहिल्यानगर- अनुसुचित जमाती (महिला)
- पुणे- सर्वसाधारण
- सांगली - सर्वसाधारण महिला
- सोलापूर- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- कोल्हापूर- सर्वसाधारण महिला
- छ. संभाजीनगर - सर्वसाधारण
- जालना- नागिरकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड- अनुसूचित महिला
- परभणी- अनुसूचित जाती
- नांदेड - सर्वसाधारण मागास प्रवर्ग
- धाराशिव- सर्वसाधारण (महिला)
- लातूर- सर्वसाधारण (महिला)
- अमरावती- सर्वसाधारण (महिला)
- अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
- वाशिम -अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ -सर्वसाधारण
- नागपूर -नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया -सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर- अनुसचित जाती (महिला)
- गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)
- हिंगोली- नागरिकांचा मागास प्रवर्ग
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर निवडणुका कधी?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत सुरु आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचनेचा मुद्दा, राज्यातील सत्तांतर त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळं राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा कोर्टात प्रलंबीत होता. अखेर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. आगामी दोन ते तीन महिन्यात राज्यात निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.