धाराशिव: सध्याच्या काळात शेतकरी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. वेळ, श्रम आणि पैशाची बचत करून ड्रोनच्या माध्यमातून शेती पिकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. ड्रोनच्या माध्यमातून एक एकर फवारणीसाठी केवळ 7 मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच औषध, पाणी आणि मनुष्यबळाची बचत होतेय. शेतकरी आता स्वत:चा ड्रोन खरेदी करू शकतात. त्यासाठी 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळत आहे, अशी माहिती धाराशिव येथील ड्रोन पायलट सतीश माकोडे यांनी दिलीय.
advertisement
ड्रोन खरेदीसाठी विशेष योजना
शेतीच्या वापरासाठी शासकीय अनुदानातून आपल्याला ड्रोन खरेदी करता येऊ शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ड्रोनसाठी अनुदान दिले जाते. गरुडा कंपनीच्या ड्रोनची किंमत आठ लाख 17 हजार असून 60 हजार रुपये ड्रोनच्या परवान्यासाठी खर्च येतो. त्यामुळे ड्रोन खरेदीसाठी एकूण नऊ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यावर सरकारी अनुदान मिळते, असे ड्रोन पायलट माकोडे सांगतात.
शेतकरी कन्या झाली क्लास वन अधिकारी, MPSC करणारांसाठी दिला लाख मोलाचा सल्ला, Video
किती आहे अनुदान?
शेतीसाठी ड्रोन खरेदी करायचे असल्यास 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महिला बचत गटांसाठी 80 टक्के अनुदान दिले जाते. फार्मा प्रोड्युसर कंपनींना 75 टक्के अनुदान मिळते. तर बीएससी ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के सबसिडी दिली जाते. तर लोनवर ड्रोन घेण्यासाठी 90 टक्के पर्यंत कर्ज घेता येते, असेही माकोडे सांगतात.
500 रुपयांना बैल गहाण ठेवला अन् अयोध्येला गेलो, शेतकऱ्यानं सांगितला 'तो' प्रसंग, Video
ड्रोन फवारणीकडे वाढता कल
ड्रोनच्या माध्यमातून कोणत्याही पिकावर फवारणी करता येते. तर ड्रोनसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने विशेष योजना देखील राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय, असे मत ड्रोन पायलट माकोडे यांनी व्यक्त केले.