TRENDING:

डाळिंब लागवड करण्याचा विचार करताय? आधी ही बातमी पाहा, Video

Last Updated:

कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारं पीक म्हणून अनेक शेतकरी डाळिंबाच्या बागेचा विचार करतात. पाहा डाळिंबाची शेती कशी करावी?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 8 ऑगस्ट: सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत. विशेषत: शेतकऱ्यांची फळबागांच्या शेतीला अधिक पसंती असते. त्यात डाळिंबासारखे कमी पाण्यावर येणारी फळबाग कमी पर्जन्यमान असणाऱ्या भागात केली जाते. डाळिंबाची शेती फायदेशीर आहे. परंतु, त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असते. अन्यथा मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता असते. बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी डाळिंबाच्या शेतीबाबत माहिती दिली आहे.
advertisement

कशी करावी लागवड?

फळबाग शेतीमध्ये डाळिंब हे चांगले उत्पन्न देणारे फळ म्हणून ओळखले जाते. कमी पाण्यात येणारे हे फळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. मात्र डाळिंबाची लागवड करताना तसेच या पिकाची वाढ होत असताना योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. डाळिंब लागवडीसाठी रोपे 5×5 किंवा 5×6 मीटर अंतरावर लावली जातात. तर गहन पद्धतीने लागवड करण्यासाठी 5×3, 5×2 किंवा 4.5 x 3 मीटर लागवड केली जाते. परंतु, डाळिंब लागवड करताना 15 ×7.5 किंवा 15×8 या पद्धतीनेच लागवड करणे आवश्यक आहे. यानुसार जर लागवड केली रोग आणि किडीपासून डाळिंबाचा बचाव होतो. तसेच लागवड करताना ती बेडवर असली पाहिजे जेणेकरून वापसा कंडिशन सतत मिळेल आणि पिकाची वाढ सतत होईल, असे चांडक सांगतात.

advertisement

कोणत्या वाणाची करावी लागवड?

डाळिंबीच्या लागवडीसाठी विविध जाती उपलब्ध आहेत. यापैकी मृदुला, लाल मस्‍कत, जी 137, फुले आरक्‍ता, भगवा या जातीच्या वाणांना शेतकऱ्यांची पसंती असते. मात्र भगवा जातीची लागवड केल्यास डाळिंबाचे बाजारात दर आणि वजन देखील चांगले मिळते, असे चांडक सांगतात.

फळांवरील बुरशीमुळे शेतकरी आहेत त्रस्त, ‘हे’ उपाय करतील संकटातून सुटका!

advertisement

कशी असावी जमीन?

डाळिंबाची लागवड ही कोणत्‍याही जमिनीत घेण्‍यात येते. अति हलक्या जमिनीपासून भारी किंवा मध्‍यम काळी व सुपीक जमीन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते. या जमिनीत झाडांची वाढ चांगली होते. हलक्‍या प्रतीची, खडकाळ मुरमाड डोंगर उताराच्‍या जमिनी सुध्‍दा चालतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे.

पाणी व्यवस्थापन

डाळिंब हे दुष्काळ सहन करणारे फळ पीक आहे. ते काही प्रमाणात पाण्याची टंचाई टिकवून ठेवू शकते. फळांचे फाटणे कमी करण्यासाठी नियमित सिंचन देखील आवश्यक आहे. हिवाळ्यात 9 ते 12 दिवसांच्या अंतराने, तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करतात. त्यामुळे पाण्याची बचत केली जाते आणि खते वापरणे सोयीचे होते.

advertisement

कमी खर्चात भरघोस उत्पन्नाची हमी, मोसंबीच्या शेतीनं शेतकरी मालामाल, Video

तेल्या रोगापासून बचाव

डाळिंबीच्या बागेला तेल्या रोगाचा अधिक धोका असतो. धनुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी) dhanucop 50 wp हे तांब्रयुक्त ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. हे बुरशीजन्य तसेच जिवाणूजन्य रोगांचे त्याच्या स्पर्शजन्य कृतीद्वारे नियंत्रित करते. हे बुरशीचे प्रभावीपणे नियंत्रण करते. सूक्ष्म कणांमुळे ते पानांना चिकटून राहते आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते. आपल्या डाळिंबीच्या बागेला तेल्याचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा वापर करावा, असे चांडक सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
डाळिंब लागवड करण्याचा विचार करताय? आधी ही बातमी पाहा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल