कशी झाली सुरुवात?
जालना जिल्ह्यातील वाटुर हे अनिल मुळे यांचं मूळ गाव. त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालं आहे. शिक्षण झाल्यानंतर अनेक दिवस ते बेरोजगार होते. यानंतर त्यांनी हाताला मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. काही दिवस पेट्रोल पंपावरती त्यांनी पेट्रोल भरून देण्याचे काम केले. त्यानंतर जेसीबी वर ड्रायव्हर म्हणून देखील काम केलं. पुढे त्यांनी कापूस खरेदीचा व्यवसाय देखील सुरू केला. मात्र या व्यवसायात देखील त्यांचा जम बसला नाही. यानंतर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्याचा निर्णय घेतला. दूध संकलन करत असताना त्यांना यातून फार काही नफा राहत नव्हता.
advertisement
आई-वडिलांच्या नावे सुरू केला ब्रँड, महिन्याला 80 लाखांची कमाई, ‘अमुल’ला देतो टक्कर, Video
त्यामुळे त्यांनी दुधावर प्रक्रिया करण्याचे ठरवलं. एका खाजगी बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी तब्बल 35 लाखांच्या मशिनरीज दुधावर प्रक्रिया करण्यासाठी विकत घेतल्या. या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सध्या ते दुधापासून पेढा, श्रीखंड, लस्सी, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकत आहेत. या पदार्थांच्या विक्रीतून त्यांना चांगला नफा देखील होत आहे. वाटुर परिसरातच त्यांचे दुधावर प्रक्रिया करण्याची युनिट आहे. या युनिटवर त्यांनी सहा लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलाय.
देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं इन्स्टंट आईस्क्रीम कधी खाल्लं का? असं काय आहे स्पेशल? VIDEO
लोकांचा विश्वास लवकर संपादन केला
पेट्रोल पंपावर ती काम करण्यापासून माझ्या जीवनाची सुरुवात झाली. मनामध्ये काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्याची धडपड होती. घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. मग मी वाटुर फाट्यावर दूध संकलन करण्यास सुरू केले यातूनही फार नफा राहत नसल्याने यावर प्रक्रिया करण्याचे ठरवलं. उत्तम दर्जाचे उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने लोकांचा विश्वास लवकर संपादन केला. यामुळे ब्रँडला विश्वास हेच नाव दिलं. सध्या खर्च वजा जाता महिन्यासाठी 50 हजारांचा निव्वळ नफा राहतो. युनिटवर सहा तरुण काम करतात त्यांच्या हाताला देखील या माध्यमातून काम मिळते, असं अनिल मुळे यांनी सांगितलं.