पारंपरिक शेतीला फाटा
जालना जिल्ह्यातील भानुसे बोरगाव येथील रहिवासी असलेले शरद भानुसे ही रेशीम लागवड करण्यापूर्वी पारंपारिक पिकांची शेती करायचे. त्यांच्या शेतामध्ये कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी नेहमीची पिके असायची. मात्र या पिकांमधून त्यांना फारसी उत्पादन होत नसे. त्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी करण्याचे ठरवले. 2018 मध्ये त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर तुती लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला नवखे असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र या अडचणींवर मात करत त्यांनी हार न मानता तुतीची शेती कायम ठेवली.
advertisement
तुम्ही कधी पाहिला का, गूळ कसा तयार होतो? मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या गुऱ्हाळाचा Video
पहिल्याच वर्षी चांगला नफा
पहिल्याच वर्षी चांगले आर्थिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी आणखी एक एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. यामुळे त्यांना आता दरवर्षी सात ते आठ लाखांचं निव्वळ उत्पादन रेशीम शेती मधून होत आहे. रेशीम शेती मधून मिळत असलेल्या उत्पन्नाबाबत ते समाधानी आहेत. याच पिकातून आलेल्या पैशांमधून त्यांनी स्वतःचे चांगले घर बांधले आहे. तसेच त्यांची मुले शहरातील चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत, असे भानुसे सांगतात.
पेट्रोल पंपावर काम केलं, जेसीबीही चालवला पण आता असा ब्रॅंड तयार केला, महिन्याला 50 हजार निव्वळ नफा
रेशीम शेतीमुळे वाढले उत्पन्न
2014 च्या आसपास आम्ही कपाशी पिक घेत होतो. यातून आम्हाला वर्षाकाठी दीड लाखांच्या आसपास उत्पादन व्हायचे. मात्र त्यात खर्च 70 ते 75000 यांच्या दरम्यान व्हायचा. त्यामुळे आम्हाला वर्षाकाठी सत्तर ते 80 हजार रुपये उरायचे. मात्र रेशीम शेतीमुळे आमचे उत्पन्न वाढले आहे, असं शरद भानुसे यांच्या पत्नी भाग्यश्री भानुसे यांनी सांगितलं.