तुम्ही कधी पाहिला का, गूळ कसा तयार होतो? मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या गुऱ्हाळाचा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गुऱ्हाळात तयार झालेल्या अस्सल गावरान गुळाच्या चवीची बात काही औरच! आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या गूळ युनिटबद्दल माहिती सांगणार आहोत.
जालना, 10 नोव्हेंबर : पूर्वीच्या काळी गूळ म्हटलं की गुऱ्हाळातून तयार झालेला अस्सल गावरान पद्धतीचा गूळ हेच समीकरण होतं. साखरेचा वापर अतिशय कमी असल्याने गुळाला मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर होती. काळाच्या ओघात गुऱ्हाळावर तयार होणारा सेंद्रिय गूळ नाहीसा होऊ लागला. आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुळाची निर्मिती केली जाऊ लागली. मात्र, गुऱ्हाळात तयार झालेल्या अस्सल गावरान गुळाच्या चवीची बात काही औरच! आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या गूळ युनिटबद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे तब्बल सव्वा 200 क्विंटन गुळाची दररोज निर्मिती केली जाते.
कशी झाली सुरुवात?
जालना जिल्ह्यातील वाटुर मंठा रोडवर अजिंक्य गूळ उद्योग नावाने हा गूळ निर्मिती प्रकल्प आहे. मंठा येथील रहिवासी असलेले बाबुराव शहाणे यांनी 2018 मध्ये या गुऱ्हाळाची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या स्तरावरती गूळ निर्मिती केली जायची. मात्र ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी तब्बल दहा चिमण्या आणि तीस कढ्या असलेल्या या अवाढव्य गूळ निर्मिती प्रकल्पाची आखणी केली. सध्या या गुऱ्हाळ वर दिवसाला दोनशे ते सव्वा 200 क्विंटल गुळाची निर्मिती केली जाते.
advertisement
बेरोजगारीवर मात करत तरुणाने उभारला स्वतःचा व्यवसाय; दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड निर्माण करून लाखोंची कमाई
दीडशे मजूर गूळ निर्मितीसाठी तर जवळपास अडीचशे मजूर ऊस तोडणी साठी असे एकूण 400 मजूर शहाणे यांच्याकडे काम करतात. अस्सल गावरान पद्धतीने म्हणजेच भेंडीचे पाणी टाकून मळी काढण्याची पद्धत या ठिकाणी वापरली जाते. यामुळे गूळ हा चवीला अतिशय उत्तम असतो. या गुळाला गुजरात राज्यामध्ये मोठी मागणी आहे असल्याचे बाबूराव शहाणे यांनी सांगितले.
advertisement
दुष्काळात सुरू केली गोशाळा, जालन्यातील कुटुंबाची अनोखी गोसेवा
मी 2018 मध्ये गावरान पद्धतीचा गूळ तयार करण्यास सुरुवात केली. हा प्लांट अतिशय छोटा होता लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे हा मोठा प्लांट सुरू केला. अतिशय उत्तम क्वालिटीचा गावरान पद्धतीचा गूळ इथे तयार होतो. या गुळाला गुजरातमध्ये भाव देखील जास्त मिळतो. आणि मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आपले गुऱ्हाळ मराठवाड्यातील सगळ्यात मोठं गुऱ्हाळ आहे, असं बाबुराव शहाणे यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 10, 2023 1:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
तुम्ही कधी पाहिला का, गूळ कसा तयार होतो? मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या गुऱ्हाळाचा Video