advertisement

BMC News: आता ५०० नाही, ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ! मुंबईकरांना बीएमसीचं गिफ्ट, महापालिकेत प्रस्ताव मंजूर

Last Updated:

BMC Property Tax: मुंबई महानगरपालिकेने (BMC) निवासी घरांसाठीच्या मालमत्ता कर (Property Tax) सवलतीची मर्यादा ५०० चौरस फुटांवरून थेट ७०० चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे.

आता ५०० नाही, ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ! मुंबईकरांना बीएमसीचं गिफ्ट, महापालिकेत प्रस्ताव मंजूर
आता ५०० नाही, ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ! मुंबईकरांना बीएमसीचं गिफ्ट, महापालिकेत प्रस्ताव मंजूर
मुंबई: मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) निवासी घरांसाठीच्या मालमत्ता कर (Property Tax) सवलतीची मर्यादा ५०० चौरस फुटांवरून थेट ७०० चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होणार आहे.

७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 'टॅक्स फ्री'चा लाभ

मुंबईत आतापर्यंत केवळ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळत होती. मात्र, वाढती महागाई आणि मुंबईकरांची गरज लक्षात घेता ही मर्यादा ७०० चौरस फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी होत होती. शिवसेना (ठाकरे गट) नेते यशोधर फणसे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सभागृहात सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. यामुळे ५०० ते ७०० चौरस फुटांच्या दरम्यान घर असलेल्या मुंबईकरांचे टॅक्सचे पैसे वाचणार आहेत. त्याशिवाय, मुंबईतील जुन्या चाळी, इमारती यांच्या पुनर्विकासातही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement

पालिकेच्या तिजोरीवर ७०० कोटींचा भार

या सवलतीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असला तरी, महानगरपालिकेच्या महसुलात मोठी घट होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीला वार्षिक सुमारे ७०० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. मात्र, जनहिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रक्रिया काय असणार?

सभागृहाने प्रस्ताव मंजूर केला असला तरी, तो लागू होण्यासाठी काही प्रशासकीय टप्पे बाकी आहेत. हा प्रस्ताव आता विभागीय अधिकारी आणि विधी व कायदे विभागाकडे पाठवला जाईल. सर्व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो महानगरपालिका आयुक्तांकडे जाईल. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर अधिकृत परिपत्रक निघेल आणि मुंबईकरांना या सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC News: आता ५०० नाही, ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ! मुंबईकरांना बीएमसीचं गिफ्ट, महापालिकेत प्रस्ताव मंजूर
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement