आमची Baby! दीड वर्षांपूर्वीच आईबाबा झालेत अंकिता-विक्की; पहिल्यांदाच लेकीला सगळ्यांसमोर आणलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ankita Lokhande Baby : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन गूड न्यूज कधी देणार याची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. दरम्यान अंकिताने आता एका शोमध्ये आपल्या लेकीलाच आणलं आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विक्की जैन दोघंही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. शिवाय वेगवेगळ्या शोमध्येही ते दिसतात. या कपलच्या लग्नाला 4 वर्षे उलटून गेली आहे. हे कपल आता गूड न्यूज कधी देणार याची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. कित्येक वेळा अंकिताच्या प्रेग्नन्सीची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.
advertisement
advertisement
advertisement
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर याबाबतची पोस्टही केली होती. ती म्हणाली, एक खास एपिसोड येतो आहे. आमची छोटी माऊ नॅशनल टीव्हीवर डेब्यू करत आहे. स्क्रिनवर काय होतं आहे, हे तिला समजत नाही पण आम्हाला माहिती आहे. आमचं हृदय भरून आलं आहे. आमच्या बेबीला तुमच्यासमोर आणताना खूप अभिमान, आनंद वाटतो आहे. माझी माऊ माझी.
advertisement
अंकिता आणि विक्कीची ही बेबी किंवा लेक म्हणजे एक मांजर आहे. 2024 मध्ये त्यांनी तिला दत्तक घेऊन आपल्या घरी आणलं. तिने त्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता. "आमची लीटल प्रिन्सेस कुटुंबात स्वागत आहे", असं कॅप्शन तिने पोस्टमध्ये दिलं होतं. तिने घरातील या नव्या सदस्याचं नाव माऊ लोखंडे जैन असं सांगितलं होतं.
advertisement
advertisement








