'माझे आई-बाबाही असेच गेले', पुष्कर श्रोत्रीनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर शोककळा, जवळच्या व्यक्तीचं निधन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीनं पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन झालं. 1 मार्च रोजी पुष्करच्या वडिलांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुष्करच्या वडिलांच्या निधनाची माहिती ताजी असताना आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीनं इमोशनल पोस्ट लिहित ही माहिती दिली. अभिनेत्री भक्ती रत्नपारखीच्या आईचं निधन झालं आहे. भक्तीनं पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
भक्तीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आई तु आहेस माझ्या सोबत. तुझा हा हसरा चेहराच सगळ्यांच्या लक्षात राहील.. 22 फेब्रुवारी 2026 ला आई ला देवाज्ञा झाली. तिचं आवडीच स्वयंपाकाच काम करत असताना घरी आलेल्या पाहुण्यांच स्वागत करुन हसत हसत कोणाला कसलाही त्रास न देता अचानक गेली. अजून ही खरं वाटत नाही आहे मला. माझे आई बाबा दोघेही असेच गेले. अचानक खुप वाईट वाटत आहे. पण ते दोघंही आहेत माझ्याबरोबर."
advertisement
पोस्टमधून हे कळतंय की भक्तीच्या सासूबाईंच निधन झालं आहे. भक्तीचं तिच्या सासूबाईंसोबत आईसारखं नातं होतं. त्यांच्या निधनाने तिच्या मोठा आघात झाला आहे. भक्तीच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं आहे. तिच्या सासूबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
भक्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत काम करतेय. त्याआधी ती 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसली होती. तिनं देवकीची रिप्लेसमेंट केली होती. भक्ती गेली अनेक वर्ष मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतेय. प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखीची ती पत्नी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 3:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझे आई-बाबाही असेच गेले', पुष्कर श्रोत्रीनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर शोककळा, जवळच्या व्यक्तीचं निधन








