advertisement

'दिवसाला 8-10 डोकेदुखीच्या गोळ्या घ्यायचो', ब्रेन हॅमरेजशी झुंज देत होता अभिनेता विकास समुद्रे, सांगितलं नेमकं घडलं!

Last Updated:
नवरा माझा नवसाचा फेम अभिनेता विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजशी झुंज देत होता. अभिनेत्यानं पहिल्यांदाचा त्याच्या आजाराविषयी आणि कठीण काळाबद्दल सांगितलं.
1/7
गेल्या काही वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी जीवघेण्या आजाराशी सामना केला. कोणाला कॅन्सर, तर कोणाला फुफ्फुसाचे आजार झाले होते. सर्जरीनंतरचा मोठा संघर्षाचा काळ पार करून कलाकारांनी मनोरंजन विश्वात कमबॅक केलं.

2/7
असाच एक अभिनेता म्हणजे विकास समुद्रे. नवरा माझा नवसाचा असो किंवा फु बाई फु सारख्या शोमधून विकास समुद्रेनं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. पण मागच्या 8 वर्ष विकास समुद्रे इंडस्ट्रीपासून दूर आहे. विकासने ब्रेन हॅम्रेजसारख्या आजाराशी दोन हात करून पुनर्जन्म घेतला आहे.

3/7
तब्बल 8 वर्षांनी विकास समुद्रे सगळ्यांसमोर आला आहे. ब्रेन हॅम्रेज आणि त्यानंतरच्या कठीण काळाबद्दल विकासनं सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विकासनं सांगितलं,
तब्बल 8 वर्षांनी विकास समुद्रे सगळ्यांसमोर आला आहे. ब्रेन हॅम्रेज आणि त्यानंतरच्या कठीण काळाबद्दल विकासनं सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विकासनं सांगितलं, "14 जानेवारी 2017 ला माझं ब्रेन हॅमरेज झालं. मी ना दारू पित होतो ना काही, डॉक्टरांना आजपर्यंत कळलं नाही की हे कशामुळे झालं."
advertisement
4/7
 "माझं डोकं दुखायचं. मी घरी न सांगता दिवसाला 8-10 डोकेदुखीच्या गोळ्या खायचो. पण डोकं दुखायचं थांबायचं नाही. पण मला कधी हे सुचलं नाही की सिटीस्कॅन करावं."
"माझं डोकं दुखायचं. मी घरी न सांगता दिवसाला 8-10 डोकेदुखीच्या गोळ्या खायचो. पण डोकं दुखायचं थांबायचं नाही. पण मला कधी हे सुचलं नाही की सिटीस्कॅन करावं."
advertisement
5/7
 "14 जानेवारीला मला अचानक चक्कर आली. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे एकही सर्जन नव्हता. रविवार होता. तीन दिवस ब्रेन हॅमरेजचे पेशंट होते. दोन्ही गेले मी एकटा वाचलो. माझ्या डॉक्टरांना माहिती नव्हतं मी कोण आहे."

6/7
विकास पुढे म्हणाला,
विकास पुढे म्हणाला, "या काळात मला बरेच कलाकार भेटून गेले पण मी शुद्धीत नव्हतो त्यामुळे मला काहीच कळलं नाही. मला खूप लोकांनी आर्थिक मदत केली. माझ्या बायकोनं जीवाचं रान करून पैसे गोळा केले. पण माझ्यामुळे जे मोठे झाले, ज्यांना मी स्क्रिन दाखवली ते लोक आजतागायत भेटायला आले नाहीत."
advertisement
7/7
या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासला मोठी मदत केली होती. ज्यामुळे तो ब्रेन हॅमरेजवर मात करू शकला. या काळात त्याच्या पत्नीने देखील मोठी साथ दिली. विकासने ब्रेन हॅमरेजमधून बाहेर आल्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या नाटकातून कमबॅक केलं. 

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement