BCCI ची मोठी घोषणा! IPL 2026 नंतर लगेच ॲक्शनमध्ये दिसणार रोहित अन् विराट, अफगाणिस्तान सीरिजचं शेड्युल जाहीर! पाहा वेळापत्रक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team India Schedule Against Afghanistan : आयपीएल 2026 च्या हंगामानंतर टीम इंडिया आपल्या 'मिशन वर्ल्ड कप 2027' ची सुरुवात करणार आहे. 'पुनःश्च हरी ओम' करण्यासाठी बीसीसीआयने खास रणनिती आखली आहे.
Afghanistan Tour of India announced by BCCI : टी-20 वर्ल्ड कप 2026 नंतर सर्वांच्या आवडीच्या आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. पुढील महिन्यापासून आयपीएल 2026 खेळवली जाईल. तर आयपीएल 2026 च्या हंगामानंतर टीम इंडिया आपल्या 'मिशन वर्ल्ड कप 2027' ची सुरुवात करणार आहे. पुन्च्च हरी ओम करण्यासाठी बीसीसीआयने खास रणनिती आखली असून आता भारतीय चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आयपीएलनंतर पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात ॲक्शनमध्ये दिसणार आहेत.
अफगाणिस्तानच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून, ही मालिका जून 2026 मध्ये खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एक ऐतिहासिक कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी अफगाणिस्तानविरुद्धची ही वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेचे नियोजन बीसीसीआयने अशा पद्धतीने केले आहे की खेळाडूंना विश्रांतीनंतर लगेच लय प्राप्त करता येईल.
advertisement
News
Here's a look at the schedule for Afghanistan Men’s Team’s tour of India in June 2026 🗓️
Details https://t.co/OkJVip4AhJ#TeamIndia | #INDvAFG pic.twitter.com/CQhIliTf2E
— BCCI (@BCCI) March 2, 2026
एकमेव कसोटी मॅच खेळवणार
advertisement
वेळापत्रकानुसार, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी मॅच 6 जून ते 10 जून दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर 14 जूनपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार असून ही मालिका 20 जूनपर्यंत चालेल. या दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असून चाहत्यांमध्ये या सामन्यांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
अफगाणिस्तानचा भारत दौरा 2026
पहिली कसोटी - 6 ते 10 जून, मुल्लानपूर.
पहिली एकदिवसीय - 14 जून, धर्मशाला.
दुसरी एकदिवसीय - 17 जून, लखनऊ.
तिसरी एकदिवसीय - 20 जून, चेन्नई.
2018 नंतर पहिलीच कसोटी मॅच
विशेष म्हणजे, 2018 नंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारी ही पहिलीच कसोटी मॅच असेल. 2018 मध्ये झालेल्या शेवटच्या कसोटीत भारतीय टीमने एक डाव आणि 262 रन्सनी मोठा विजय मिळवला होता. त्या मॅचमध्ये शिखर धवनने 107 रन्सची तुफानी खेळी केली होती आणि अजिंक्य रहाणेने भारतीय टीमचे नेतृत्व केले होते. आता प्रदीर्घ काळानंतर हे दोन संघ पुन्हा एकदा रेड बॉल क्रिकेटमध्ये आमनेसामने येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI ची मोठी घोषणा! IPL 2026 नंतर लगेच ॲक्शनमध्ये दिसणार रोहित अन् विराट, अफगाणिस्तान सीरिजचं शेड्युल जाहीर! पाहा वेळापत्रक








