आज होलिका दहन करता आले नाही तर उद्या करता येणार का? 3 मार्चला चंद्रग्रहण असूनही 'ही' वेळ ठरेल अत्यंत शुभ!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज, 2 मार्च 2026 रोजी काही कारणास्तव तुम्हाला होलिका दहन करता आले नसेल, तर मनात शंका आणू नका. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार, यंदा 3 मार्च 2026 रोजी देखील होलिका दहन करण्यासाठी एक विशेष आणि शुद्ध मुहूर्त उपलब्ध आहे.
Holika Dahan 2026 : आज, 2 मार्च 2026 रोजी काही कारणास्तव तुम्हाला होलिका दहन करता आले नसेल, तर मनात शंका आणू नका. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार, यंदा 3 मार्च 2026 रोजी देखील होलिका दहन करण्यासाठी एक विशेष आणि शुद्ध मुहूर्त उपलब्ध आहे. वास्तविक, 3 मार्चला होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे अनेक भाविकांमध्ये गोंधळ आहे, पण शास्त्रानुसार ग्रहण संपल्यानंतर होळी पेटवणे अत्यंत शुभ मानले जाते.
3 मार्चला होलिका दहन करता येईल का?
हो, 3 मार्च रोजी होलिका दहन करणे केवळ शक्यच नाही, तर अनेक पंचांगकर्त्यांच्या मते ते अधिक श्रेयस्कर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भद्रा काळ आणि चंद्रग्रहण. ज्योतिषाचार्यांच्या मते, 2 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत भद्रा काळ आहे. शास्त्रात भद्रेत होळी पेटवणे अशुभ मानले जाते. 3 मार्चच्या पहाटे भद्रा संपत आहे, त्यामुळे 3 मार्चचा दिवस या दोषापासून मुक्त आहे. 3 मार्चला दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:47 या काळात चंद्रग्रहण आहे. ग्रहणाच्या काळात अग्नी प्रज्वलन निषिद्ध असते. परंतु, सायंकाळी 6:47 ला ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण वातावरण शुद्ध होते. ग्रहण मोक्षानंतर स्नान करून केलेली होळीची पूजा ही 'पवित्र' मानली जाते.
advertisement
तब्बल 122 वर्षांनंतर दुर्मिळ योग
यावर्षी, तब्बल 122 वर्षानंतर असा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. 3 मार्च, म्हणजेच उद्या 2026 मधील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. 122 वर्षांपूर्वी म्हणजेच 1904 मध्ये होळीच्या दिवशी चंद्रग्रहण झाले होते. ज्योतिषीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून उद्याचा दिवस खूप महत्वाचा मनाला जात आहे.
3 मार्चला होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी?
प्रसिद्ध जोतिषाचार्यांच्या मते, 3 मार्च रोजी पौणिमा तिथी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत असेल. त्याच वेळी, प्रदोष काळातही पौर्णिमेचा प्रभाव राहील आणि चंद्रग्रहण संध्याकाळी 6:47 या वेळेत संपेल. अशा परिस्थितीत, ग्रहण संपल्यानंतर होलिका दहन करणे योग्य राहील आणि या दिवशी भद्राचा प्रभाव देखील नसेल. अशा परिस्थितीत, 3 मार्च रोजी संध्याकाळी ग्रहण संपल्यानंतर होलिका दहन आणि पूजा करणे योग्य आणि शुभ राहील.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 1:32 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज होलिका दहन करता आले नाही तर उद्या करता येणार का? 3 मार्चला चंद्रग्रहण असूनही 'ही' वेळ ठरेल अत्यंत शुभ!








