TRENDING:

आठवी पास तरूणानं चालवलं डोकं, ‘या’ व्यवसायातून करतोय लाखोंची कमाई

Last Updated:

फक्त आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 6 सप्टेंबर : कोणताही व्यवसाय असो मन लावून मेहनत केली आणि काटेकोर नियोजन केलं तर त्यामध्ये नक्की यश मिळतं. जालना जिल्ह्यातल्या चितळी पुतळेमधला रहिवाशी असलेल्या गंगाधर कुबरे या तरुणानानं हे सिद्ध केलंय. फक्त आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवलाय.
advertisement

कसं मिळवलं यश

गंगाधर यांनी मुंबईत अनेक वर्ष गॅरेज चालवले. घरातली शेती असल्यानं त्यामधून उत्पन्न मिळवण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी दुग्धव्यवसायाची निवड केली. मागच्या वर्षी पंजाबमधून पाच गायींची खरेदी केली. त्यांच्या गोठ्यासाठी शेतामध्येच शेड उभारले.

Video: आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा गायक, सात पिढ्यांपासून जपली लोककलेची परंपरा

गायींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मुक्त संचार पद्धतीने गोठ्याची आखणी केली. दुध काढण्यासाठी ऑटोमॅटिक मशिन्स आणले. वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याची सोय केली. घरी असलेल्या शेतात काही चाऱ्याची लागवड केली. सध्या त्यांच्या व्यवसायातून त्यांना महिन्याला 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळते. तर वर्षाकाठी चार ते पाच लाख सहज मिळतात.

advertisement

मी बऱ्याच दिवसांपासून कोणता व्यवसाय करावा याचा अभ्यास करत होतो. या अभ्यासानंतर दुग्धव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दुसऱ्या राज्यातून गायींची खरेदी केली. त्यांना इकडच्या वातावरणात समरस व्हायला थोडा वेळ लागला. सध्या पाच गायींचे मिळून 70 ते 80 लिटर दूध निघते यातील काही डेअरीला तर काही हॉटेलला पुरवले जाते. त्यामधून महिन्याला 50 ते 60 हजार रुपये मिळतात, असं यांनी सांगितलं.

advertisement

दिव्यांग असूनही मानली नाही हार, आदित्यनं जे करून दाखवलं ते पाहून कराल सॅल्युट, Video

मराठवाडा यासारख्या दुष्काळी प्रदेशात केवळ हंगामी पिके न घेता वेगवेगळी पिके घेऊन शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायातून देखील चांगले उत्पादन मिळते. कष्ट आणि काटेकोर नियोजन याच्या बळावर गंगाधर कुबरे यांनी दुग्धव्यवसाय फायदेशीर करून दाखवला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
आठवी पास तरूणानं चालवलं डोकं, ‘या’ व्यवसायातून करतोय लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल