अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कापूस पिकाला फटका बसला आहे. कापूस पिकाची वाढ पाहिजे तशी झालेली नाही. यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. यापासून वाचण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
पांढरी माशीचा प्रादुर्भाव सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या किटकांचा प्रादुर्भावही झालेला दिसून येत आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या तर पिकाच्या पुढील वाढीसाठी ते अतिशय उत्तम राहील. काही वेळा शेतकरी चुकीच्या पद्धतीने उपाययोजना करतात आणि मग त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
DRPPL संस्थेचा कौतुकास्पद पुढाकार, धारावीमधल्या तरुणांना मिळाली रोजगाराची संधी
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसामुळे शेतात जमा झालेले पाणी बाहेर कसे काढता येईल याकडे सर्वात आधी लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कापसावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे शोधणेही तितकेच महत्वाचे आहेत. रोगाचे निदान लागले तर त्यावर उपाय लवकरात लवकर करता येतात.
निंबोळी अर्क जास्त गुणकारी - निंबोळी अर्क सर्व रोगांवर खूप महत्वाचा ठरतो. पोळ्याची अमावस्या झाली की गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून यायला लागतो. त्यावर सुद्धा निंबोळी अर्क आणि मार्केटमध्ये मिळणारे काही कीटकनाशक फवारणी लगेच केली पाहिजे. पावसामुळे होणारे कापूस पिकाचे नुकसान जर आपल्याला टाळायचे असेल हे सर्व उपाय केले पाहिजेत. कापसाला जर कोणत्याही औषधाचे प्रमाण जास्त किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.