DRPPL संस्थेचा कौतुकास्पद पुढाकार, धारावीमधल्या तरुणांना मिळाली रोजगाराची संधी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
धारावीमध्ये डीआरपीपीएल या संस्थेने तरुणांना मोफत मोबाईल रिपेरिंग कोर्स, तरुणींना मोफत ब्युटीशियनचा कोर्स प्राप्त करून दिला आहे. या कोर्सच्या अंतर्गत मुलांना मोबाईल रिपेरिंगचा कोर्स शिकवण्यात आला.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
धाराशिव : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. धारावी सारख्या भागात आजही आपल्याला अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. अशातच तेथील तरुणांसमोर बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. येथील तरुणांमध्ये कौशल्य विकास होणं काळाची गरज आहे. अशातच संस्था जेव्हा तरुणांसाठी पुढे येतात, तेव्हा तरुणांना देखील कौशल्य विकास करण्याचे प्रोत्साहन मिळते.
advertisement
धारावीमध्ये डीआरपीपीएल या संस्थेने तरुणांना मोफत मोबाईल रिपेरिंग कोर्स, तरुणींना मोफत ब्युटीशियनचा कोर्स प्राप्त करून दिला आहे. या कोर्सच्या अंतर्गत मुलांना मोबाईल रिपेरिंगचा कोर्स शिकवण्यात आला. या कोर्समध्ये मुलांना मोबाईल रिपेरिंग आणि मोबाईल निगडित इतर गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. तर मुलींना ब्युटीशियनचा कोर्स शिकवण्यात आला. या कोर्स अंतर्गत हेअर मेकअप या सर्व गोष्टींसह वैयक्तिक विकास या गोष्टी देखील शिकवण्यात आल्या.
advertisement
या कोर्सच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधीदेखील उपलब्ध झाली. त्यापैकी एका तरुणाने स्वतःचे मोबाईल शॉप सुरू केले असून त्याची कमाई देखील सुरू झाली आहे. तसेच अनेक गृहिणींना मोफत ब्युटीशियन कोर्स उपलब्ध करून दिल्यामुळे त्यादेखील त्यांच्या क्षेत्रात काम मिळवू लागले आहे.
advertisement
जालन्यातील संत्रे कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी!, चौथी उच्चशिक्षित पिढी गणेश मूर्तींच्या व्यवसायात, VIDEO
view commentsतरुण आणि तरुणी यांचा कोर्सनंतरचा अनुभव हा खूपच चांगला असून त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द दुप्पट वाढली आहे. तसेच आता आम्ही बाहेरच्या जगाशी संपर्क साधून आमची काम मिळू शकतो, हा आत्मविश्वास देखील त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. असे कोर्स धारावी तसेच मुंबईच्या इतर भागांमध्ये देखील वारंवार मोफत पद्धतीने घेण्यात आले तर तरुण-तरुणी समोर मत रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2024 5:39 PM IST

