धाराशिवमध्ये वाढतायेत डेंग्यूचे रुग्ण, आताच जाणून घ्या लक्षणं आणि उपाय, डॉक्टरांनी दिली ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
निलेश येळापुरे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, जो संक्रमित डासांच्या चावण्यामुळे पसरतो.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा परिसरात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डेंग्यूची लक्षणे नेमकी काय आहे, त्यासाठी काय काळजी घ्यावी, उपचार पद्धतीने काय आहे, याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष आढावा.
निलेश येळापुरे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, जो संक्रमित डासांच्या चावण्यामुळे पसरतो. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेटची संख्या कमी होते आणि कधीकधी यामुळे रक्तश्रावही होतो. त्यामुळे डेंग्यूवर वेळीच योग्य वेळी उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. बहुतेक रुग्ण हे उपचारानंतर बरे होतात. मात्र, काही रुग्णांसाठी डेंग्यू हा घातकदेखील ठरू शकतो.
advertisement
डेंग्यूसाठी विशेष म्हणजे आपल्या घराच्या जवळ किंवा इमारतीत वस्तीत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासांचे पुनरुत्पादन होते. पाणी साचलेले खड्डे असतील तर ते बुजून काढावेत. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. घरातल्या टाक्यांमधील सांडपाणी व्यवस्थित झाकून ठेवावे. डास घरात येऊ नये, त्यासाठी जाळ्या बसवाव्यात. घराभोवती स्वच्छता राखावी. डासांच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
advertisement
‘आप्पाचा विषय लय हार्ड’, रॅप सोशल मीडियावर तुफान गाजतय रॅप साँग, कोण आहे हा तरुण?
डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे. त्यामुळे हा आजार अंगावर काढू नये. लक्षणे दिसून येताच तत्काळ तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटावे. कारण डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा विषाणूजन्य ताप तुमच्या शरीराला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसून येताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 04, 2024 3:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवमध्ये वाढतायेत डेंग्यूचे रुग्ण, आताच जाणून घ्या लक्षणं आणि उपाय, डॉक्टरांनी दिली ही महत्त्वाची माहिती