शेतकरी मास्तर देतायंत प्रशिक्षण
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अकोलदेव येथे नवीन बैलांना शेती कामासाठी प्रशिक्षित करण्यासाठी अनुभावी शेतकरी मास्तराकडून एक प्रकारे शाळा भरवली जाते. अकोलदेव येथील परमेश्वर सवडे, हरीभाऊ बोर्डे, मोहन सवडे हे हौशी आणि छंदापायी शेतकरी मास्तर म्हणून बैलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करून घेत आहेत.
दुग्ध व्यवसायातून लाखोंची कमाई, आठवी पास तरुणानं कसं केलं नियोजन?
advertisement
बैल कामाला पेटवणे
काळाच्या ओघात आणि यांत्रिकीकरणाच्या युगात शेती कामासाठी देशी बैल जोडी पाळने शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणा च्या साहाय्याने शेती करू लागला आहे. तरी शेतीची पाहिजे तशी अंतर्गत मशागत होत नसल्याने पुन्हा शेतकरी बैलांचीच शेती बरी म्हणून नविन बैल खरेदी करत आहेत. त्यासाठी बैलांना प्रशिक्षित करून घेत आहेच. याला ग्रामीण भागात बैलांना शिक्षण देणे म्हणजे बैल पेटवणे असे म्हणतात.
Video: आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा गायक, सात पिढ्यांपासून जपली लोककलेची परंपरा
कसे देतात प्रशिक्षण?
या बैलांना प्रशिक्षित करण्यासाठी अकोलदेव येथील प्रशिक्षित शेतकरी हौशी मास्तर विनामोबदला बैलांना प्रशिक्षण देतात. मोकळ्या जागेत धावपट्टी तयार करून हे प्रशिक्षण दिले जाते. मध्य भागी सुती धागा बांधलेला असतो. बैलांना हातात धरून धाव पट्टीवर अगोदर दोन तीन वेळेस रिकामे पळविले जाते. ही धाव पट्टी बैलांच्या लक्षात आल्यानंतर प्रशिक्षित शेतकरी मास्तर बैल गाडाल्या (छेकडा) जुंपून बैलगाडा पळविला जातो. बैलांनी सुती धागा बरोबर तोडला की बैल जोडी प्रशिक्षित झाल्याचे समजले जाते. पुढे याच प्रशिक्षित बैल जोडया शंकर पटासाठी निवड केली जाते.
या नवीन बैलांना शिकवणे म्हणजे हा जिवावरचा खेळ असतो. यासाठी चांगली अंगमेहनत करूनच हा बैल गाडा हाकलावा लागतो. एकदा प्रशिक्षण दिलेली बैलजोडी शेतीचे कोणतेही काम असूद्या मागे हटत नाही, असे प्रशिक्षक शेतकरी परमेश्वर सवडे, हरीभाऊ बोर्डे, मोहन सवडे यांनी सांगितले. ही शिकवणी करताना बैलांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचली जात नाही हे विशेष असते.