पुणे : महाराष्ट्रातील काही शेतकरी आधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेत आहेत. पुण्यातील हिंजवडी मान परिसरात राहणारे ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मर्स क्लब या नावाने शेतकरी ग्रुप सुरू केला. 25 वर्षांपासून या ग्रुपच्या माध्यमातून ते काम करत आहेत. या क्लबच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील दीड लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही विक्री केली जाते. सेंद्रिय शेतीतून लाखोंचा नफा क्लबमधील शेतकऱ्यांना मिळत आहे.
advertisement
25 वर्षांपासून कार्यरत शेतकरी गट
पुण्यातून सुरू झालेला अभिनव फार्मर्स क्लब हा शेतकरी गट गेली 25 वर्ष कार्यरत आहे. सुरुवातीला या क्लबच्या माध्यमातून पारंपारिक शेती केली जात होती. यामध्ये काही पैसे मिळत नसल्यामुळे आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. कमी जागेमध्ये पॉलिहाऊस उभे करून त्यामध्ये फुलांची लागवड केली. त्या फुलांना काही दिवस भाव असायचा तर इतर दिवस त्यांना अजिबात भाव मिळत नव्हता. त्यातून अपेक्षित नफा मिळत नव्हता. त्यामुळे वर्षभर पैसे मिळतील अशी भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला, असं बोडके सांगतात.
Agriculture: भाजीपाला लागवडीतून महाराष्ट्रातील शेतकरी लखपती! किती लाख कमवले वाचा
कसं चालतं काम?
क्लबच्या माध्यमातून एक लाख साठ हजार शेतकरी मिळून काम करत आहेत. तसंच शनिवारी आणि रविवारी शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्यामध्ये भाज्या, फळं, कडधान्य याची लागवड, क्लिनिंग, ग्रीडिंग याबाबत माहिती दिली जाते. यामध्ये महिलां बचत गटाना घेतलं. विक्री करण्यासाठी हौसिंग सोसायटी शोधल्या. मग नाबार्डकडे याची नोंदणी केली. कारण हा ग्रुप नाबार्डचा आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला भाजीपाला विक्री करण्याचं नियोजन केलं. त्यानुसार आज देशातील 36 लाख ग्राहकांना तर पुण्यामध्ये 18 हजार ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विक्री केला जातो.
तरुणांचाही सहभाग
शेतीसाठी मजूर मिळत नाही ही फार मोठी समस्या आहे. यामुळे या क्षेत्रात तरुणांना देखील आणत आहोत. ती मुलं आता पॉवर टीलर्स हायड्रोपोनिक्स चारा युनिट तयार करत आहेत. गाईचं दूध पॅकिंग, बायोगॅस असे नवनवीन प्रयोग सुरु केले आहेत. तसेच मार्केटिंग पाहिलं तर राज्यातील ज्या भागातील लोक ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत त्यांच्याशी जोडून देतो. बास्केट कॉन्सेप्टने आम्ही ग्राहकांना माल विक्री करतो. जी विक्री आहे त्यामध्ये दलाल काढला. यामुळे त्यांना जाणारा पैसा वाचून यामधून अजून जास्तीचे पैसे मिळतात. डॉक्टर, इंजिनियर, वकील देखील आमचे ग्राहक आहेत, असे बोडके सांगतात.
रस्त्यात ऊसाचा रस पिता, त्यातून पोटात ग्रीस जात नाही ना? जालनाकरांनी शोधली भन्नाट आयडिया
भारतीय भाजीपाल्याला प्राधान्य
क्लबच्या माध्यमातून भाजीपाल्याची शेती व विक्री सुरू केली. पण ब्रोकली सारख्या चायनिज भाज्यांना मागणी कमी असल्याने भारतीय भाजीपाला, दूध आणि फळांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय भाज्यांमध्ये 35 ते 40 प्रकार करतो. तसेच इंग्लिश भाज्यामध्ये 10 ते 15 आणि कडधान्यांमध्ये 15 ते 20 प्रकार आहेत. दूध, पनीर, श्रीखंड, आम्रखंड असे आम्ही 115 प्रकार सर्व शेतकरी मिळून तयार करतो. मंगळवार आणि रविवारी सर्व भाजीपाला गोळा केला जातो. यामध्ये पॅकिंग क्लिनींग ग्रीडींगचं काम हे बचत गटातील महिला करतात आणि भाजीपाला घरपोहोच केला जातो, असेही बोडके यांनी सांगितले.