रस्त्यात ऊसाचा रस पिता, त्यातून पोटात ग्रीस जात नाही ना? जालनाकरांनी शोधली भन्नाट आयडिया

Last Updated:

तुम्ही कधी विचार केलाय का, ऊसाच्या रसाचं जे लोखंडी मशीन असतं त्यात असणारं ग्रीस चुकून रसात मिसळलं आणि आपल्या पोटात गेलं तर आपल्या आरोग्याचे आतल्या आत काय हाल होत असतील...

+
जालनाकरांना

जालनाकरांना आता एकदम शुद्ध नैसर्गिक ऊसाचा रस प्यायला मिळतो.

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : उकाडा आता इतका वाढलाय की, रस्त्यात थांबून थांबून पाणी पिण्याची वेळ येते. लिंबाचा किंवा ऊसाचा रस प्यायला तर जीव जरा थंड होतो. ऊसाच्या रसाचा ग्लास एकदा तोंडाला लावला की, अनेकजण गटागट तो रिकामा करतात. पण तुम्ही कधी एक विचार केलाय का, ऊसाच्या रसाचं जे लोखंडी मशीन असतं त्यात असणारं ग्रीस चुकून रसात मिसळलं आणि आपल्या पोटात गेलं तर आपल्या आरोग्याचे आतल्या आत काय हाल होत असतील...हाच विचार करून जालनावासियांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली. त्यामुळे जालनाकरांना आता एकदम शुद्ध नैसर्गिक ऊसाचा रस प्यायला मिळतो.
advertisement
जालना जिल्ह्याच्या राजूर रोडवरील बावणे पिंपळगाव हे एक छोटंसं खेडं आहे, पण इथं राहणारी माणसं बुद्धिमान आहेत. त्यांची शेती जोमात सुरूये पण फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी उत्पन्नवाढीच्या नवनवीन संधी शोधून काढल्या आहेत. इथले रहिवासी अंकुश कोल्हे यांनी 25 वर्षांपूर्वी पारंपरिक लाकडी रसवंतीगृहाची सुरूवात केली. राजूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रसवंतीगृहाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. पुढे हाताने ओढायची रसवंती मागे पडली आणि नवीन बैलांच्या सहाय्याने चालणारं पारंपारिक रसवंतीगृह त्यांनी सुरू केलं. या लाकडी मशीनमधून ऊसाचा नैसर्गिक रस बाहेर येतो आणि त्यामुळे ग्राहकांचं आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
आज बावणे पिंपळगावातील 20 ते 25 कुटुंबांचा गाडा याच व्यवसायावर चालतोय. ते 4 महिने शेतात बैलांचा वापर करतात आणि उरलेले 8 महिने रसवंतीगृहात त्यांना बैलांचा मोठा वापर होतो. हे पूर्ण 8 महिने व्यवसाय सुरू असतो पावसाळ्यात मात्र शेतीच्या कामांमुळे त्यात खंड पडतो. हिवाळ्यात कमाई थोडी कमी होते पण त्याची कसर उन्हाळ्यात पूरेपूर भरून निघते.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे इथले रहिवासी कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायातून दररोज 2 ते अडीच हजार रुपयांची सरासरी कमाई होते. तर, रविवारी हाच नफा 4 ते 5 हजारांवर सहज जातो, असं त्यांनी सांगतलं. सणावाराच्या दिवशी भाविकांची मांदियाळी असल्याने नफा आणखी वाढतो.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/Food/
रस्त्यात ऊसाचा रस पिता, त्यातून पोटात ग्रीस जात नाही ना? जालनाकरांनी शोधली भन्नाट आयडिया
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement