TRENDING:

नोकरीला केलं बाय बाय, तरुणानं सुरू केली शेती, आज घरी बसून कमावतोय लाखो रुपये

Last Updated:

सुरुवातीला लोक आता हा शेती करणार या शब्दात टोमणे मारू लागले. मात्र, लोकांच्या टोमण्यांची पर्वा न करता त्यांनी आपले काम चालू ठेवले. त्याचाच परिणाम असा झाला की, आज ते नोकरीपेक्षा शेतीत जास्त नफा कमावत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
तरुण शेतकरी
तरुण शेतकरी
advertisement

रायबरेली : बदलत्या काळानुसार आता अनेक तरुण आता शेतीकडे वळताना दिसत आहेत. करिअरच्या दृष्टीने नोकरीऐवजी शेती करणे त्यांना सोपे वाटत आहेत. त्यामुळे काही तरुण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात शेती करत चांगला नफाही मिळवत आहेत. यातच आता एका तरुणाने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. आज हा तरुण घरी बसून लाखो रुपये कमावत आहे.

advertisement

ऋतिक तिवारी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते उत्तरप्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील शिवगढच्या कुम्हरावा गावातील रहिवासी आहेत. गेल्या दशकापासून ते आपली पारंपरिक शेती सोडून भाजीपाल्याची शेती करत आहेत. पारंपरिक शेतीच्या तुलनेत यामध्ये जास्त नफा असल्याने त्यांनी भाजीपाल्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, ते शिक्षणात खूप कमजोर होते. त्यामुळे त्यांनी दहावीच्या शिक्षणानंतर प्रयागराज येथील हंडियामधील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये 6 महिने काम केले. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. त्यामुळे ते तिथून परत आले आणि गावातील आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर भाजीपाल्याची शेती करू लागले.

advertisement

सुरुवातीला लोक आता हा शेती करणार या शब्दात टोमणे मारू लागले. मात्र, लोकांच्या टोमण्यांची पर्वा न करता त्यांनी आपले काम चालू ठेवले. त्याचाच परिणाम असा झाला की, आज ते नोकरीपेक्षा शेतीत जास्त नफा कमावत आहे. हृतिक यांनी 3.5 एकर शेतीक्षेत्रात भाजीपाल्याची लागवड सुरू केली. यामध्ये ते फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, मिरची, वांगी, भोपळा तसेच बीटची लागवड करतात. भाजीपाला लागवडीसाठी माती हलकी असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेणाचा वापर शेतात केला जातो, जेणेकरून शेतात गांडुळे वाढू शकतील. गांडुळे जमिनीत खोलवर जाऊन माती ठिसूळ करतात. हलक्या जमिनीमुळे झाडांनाही मुबलक प्रमाणात पाणी मिळते. आता त्यांना पारंपारिक शेतीपेक्षा भाजीपाला शेतीत जास्त नफा मिळतो, असे त्यांनी सांगितले.

advertisement

वडील चालवतात इलेक्ट्रॉनिक्स शॉप, मुलगा UPSC च्या परिक्षेत आला देशात पहिला, अत्यंत प्रेरणादायी कहाणी!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

एका एकरासाठी 25 हजार ते 30 हजार रुपये खर्च येतो. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न पाहिले असता कोणीही घरी बसून वर्षाला दोन ते तीन लाख रुपये कमवू शकतो. शेतातील भाजीपाला ते रायबरेली शहरासह बाराबंकीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. तेथून त्यांना चांगला नफा मिळतो. तर भाजीपाला शेतीतील उत्पादन हंगामावर आणि उत्पन्न बाजारभावावर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
नोकरीला केलं बाय बाय, तरुणानं सुरू केली शेती, आज घरी बसून कमावतोय लाखो रुपये
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल