डोंबिवली : मराठी मुली आता अनेक मोठ्या क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावत आहेत. ऐश्वर्या म्हात्रे या मराठी डोंबिवलीकर तरुणीने स्वतःचा ऐश्वर्य फॅशन नावाचा ब्रँड 3 वर्षांपूर्वी सुरू केला. ऐश्वर्य फॅशनमध्ये ऐश्वर्या सुंदर ब्लाऊजवर आरी वर्क करून देते. यामध्ये तुम्ही म्हणाल तसा ब्लाऊज तुम्हाला शिवून आणि डिझाईन करून मिळेल. कोणाला खूप अर्जंट हवा असेल तर फक्त तीन दिवसांमध्ये ती डिझाईनएबल ब्लाऊज बनवून देते. लग्नासाठी नवरीला लागणारे सगळे कपडे यामध्ये अगदी घागरा, लेहंगा इथे रेंटने मिळतात. जर कोणाला मॅटरनिटी शूट किंवा प्री-वेडिंग शूट करायचं असेल तर त्यासाठी लागणारे कलरफुल आणि लॉन्ग गाऊन सुद्धा तुम्हाला इथे रेंट मध्ये मिळतील.
advertisement
ऐश्वर्याने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गोदरेज कंपनीमध्ये एका चांगल्या पदावर काम सुद्धा केलं. फॅशन डिझाइनिंगची तिला फार पूर्वीपासून आवड होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिला प्रचंड पाठिंबा दिला आणि त्यावेळेस तिने आधी घरूनच या ऐश्वर्य फॅशनला सुरुवात केली. घरूनच ती वेगवेगळ्या प्रकारे आरीवर्क करून आपल्या क्लायंटला देऊ लागली. अनेक मराठी कलाकार आवर्जून ऐश्वर्याकडून सुंदर ब्लाऊज डिझाईन करून घेतात.
दोघेही खास मित्र, आज दिवसाला कमावतात 15 हजार रुपये, असं काय केलं?
'मी अगदी वेलवेट पासून ते नवरी करिता लागणाऱ्या ब्लाऊजचे सुद्धा डिझाईन करते. त्याला आणखी सुंदर आणि भरजडी कसं करता येईल यावर माझ मुख्य लक्ष असतं. माझ्या या संपूर्ण प्रवासात माझ्या पतीने मला खूप साथ दिली. ते म्हणाले की तू नव्याने व्यवसाय सुरू कर म्हणून मी हा व्यवसाय सुरू करू शकले', असे व्यावसायिका ऐश्वर्या म्हात्रे हिने सांगितले.
मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लग्नासाठी किंवा इतर फंक्शनसाठी सुंदर ब्लाऊज डिझाईन करून हवे असतील, तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या शिवमंदीर रोडवरील ऐश्वर्या फॅशनला भेट द्या.