दोघेही खास मित्र, आज दिवसाला कमावतात 15 हजार रुपये, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
डोंबिवलीतील प्रवीण रेवणकर आणि धीरज भोळे यांनी हे कॅफे सुरू केले असून, याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अगदी पिझ्झा बेसपासून ते बर्गरपर्यंत सगळं काही समोरासमोर बनवले जातं. त्यामुळे इथल्या पिझ्झाच्या व्हेरायटी खाण्यासाठी लोक आवर्जून इथे येतात.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली: हल्ली अनेक उच्चशिक्षित मराठी तरुण एकत्र येऊन व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या कॅफे स्नॅकचॅट सध्या सर्वांच्याच आवडीचे होत आहे. डोंबिवलीतील प्रवीण रेवणकर आणि धीरज भोळे यांनी हे कॅफे सुरू केले असून, याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे अगदी पिझ्झा बेसपासून ते बर्गरपर्यंत सगळं काही समोरासमोर बनवले जातं. त्यामुळे इथल्या पिझ्झाच्या व्हेरायटी खाण्यासाठी लोक आवर्जून इथे येतात.
advertisement
या कॅफेमध्ये तुम्हाला पिझ्झाचे आणि बर्गरचे 10 ते 15 हून अधिक प्रकार मिळतील. इथे मिळणारे चिकन पॉपकॉर्न तर खूप क्रिस्पी असल्याने डोंबिवलीकरांची याला अधिक पसंती आहे. तुम्हाला सुद्धा क्रीमी पास्ता खाण्याची इच्छा असेल तर हे कॅफे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. विशेष म्हणजे यांच्या इथे मिळणारे व्हेज तंदूर सुद्धा 10 हून अधिक प्रकारांमध्ये मिळतात. ज्यामध्ये पनीर टिक्का पासून पनीर अफगाणीपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे.
advertisement
प्रवीण याचे शिक्षण बी.कॉम मधून झालेले असून धीरजने सुद्धा बी.कॉम मधून शिक्षण पूर्ण करून सीएचे अटेम्प्ट दिलेले आहेत. प्रवीण आणि धीरज या व्यवसायातून दिवसाला रोज 10 ते 15 हजारांची कमाई करतात. यामध्ये त्यांची दिवसभराची मेहनत आणि कष्टाचे फळ आहे, असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
'आम्ही कॉलेजमध्ये असतानाच दोघांनी ठरवले होते की आपला काहीतरी साईड बिजनेस असावा. पण याला डोंबिवलीकरांचा इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की आम्ही फुल टाइम यावर काम करायला सुरुवात केली. अजूनही मी कॅफे चालवताना आर्किटेक्ट म्हणून सुद्धा काम करतो. मित्रांची सुद्धा वेगळी फर्म आहे. कॅफे सुरू करण्याआधीच आम्ही ठरवले होते की याचे किचन हे ओपन असेल जेणेकरून ग्राहकांना आपले फूड कसे बनते हे पाहता सुद्धा येईल,' असे प्रवीण ने सांगितले.
advertisement
तुम्हालाही स्नॅक्ससाठी उत्तम कॅफे हवा असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या शास्त्रीनगर येथील जोंधळे शाळेच्या अगदी समोर असणाऱ्या या कॅफे स्नॅकचॅट ला भेट द्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 28, 2025 2:16 PM IST