TRENDING:

प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर केला किराणा व्यवसाय यशस्वी, आता वर्षाला 1 कोटींची उलाढाल

Last Updated:

अमरावतीमधील या व्यक्तीचे नाव वासुदेवराव सुरजुसे असं असून आज त्यांची वर्षाची उलाढाल ही एक करोड रुपयांच्यावर आहे. यांचा संघर्ष आजच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी 
advertisement

अमरावती : कोणताही व्यवसाय करायला गेलोत तर तो लहान किंवा मोठा नसतो. व्यक्तीने जर जिद्दीने न खचता सातत्य ठेवले तर एक दिवस तो व्यक्ती नक्की यशस्वी होतो. हेच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. अमरावतीमधील या व्यक्तीचे नाव वासुदेवराव सुरजुसे असं असून आज त्यांची वर्षाची उलाढाल ही एक करोड रुपयांच्यावर आहे चला तर जाणून घेऊ त्यांच्या यशाची गाथा.

advertisement

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेलं राजुरा बाजार हे वासुदेवराव सुरजुसे यांचे गाव. यांचा संघर्ष आजच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी मेहनत जिद्द प्रामाणिकपणा याच्या जोरावर किराणा व्यवसायात आपले फार मोठे नाव केले आहे.

YouTube वर Video पाहिला अन् शेतकरी मालामाल, एकरात 15 लाखांची कमाई

किराणा व्यवसायिक वासुदेवराव सुरजुसे यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला तेव्हा ते सांगतात की, माझे वडील हे रखवालीचे काम करत होते. त्याचबरोबर मासेमारी सुद्धा करत होते. आम्ही पाच भावंड होतो. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे माझं शिक्षण हे फक्त पाचवीपर्यंत झालेले आहे. मला व्यवसायाची आवड ही तिसऱ्या वर्गापासून सुरू झाली. दिवाळीच्या आठ दिवसाआधी येणारा आठवी हा सण असतो त्या दिवशी मी आठवीला लागणारे पूजेचे साहित्य विकत होतो. तेव्हा दहा पैसे वीस पैसे असे मला मिळत होते.

advertisement

त्यानंतर मी ब्रेड विकायला सुरुवात केली असं करता करता यातून जे पैसे मिळत होते ते मी जमा करत होतो आणि पुढे नवनवीन व्यवसाय करत गेलो. तेव्हा मला एक नोकरी लागणार होती त्यासाठी मला नागपूरला जायचे होते पण माझ्या आई वडिलांजवळ आधीच कोणी नसल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. नंतर मी बकऱ्या चारायला सुरुवात केली काही घरच्या बकऱ्या आणि काही इतरांच्या बकऱ्या अशा मी चारत होतो. त्या बकऱ्या चारत असताना मला दोन रुपये महिना असा प्रत्येकाकडून मिळत होता. त्यानंतर त्या पैशातून मी एक बकरीचे पिल्लू विकत घेतले आणि त्यातून माझ्याकडे पैसे येऊ लागले.

advertisement

त्यानंतर मी काही बकऱ्या विक्रीस काढल्या आणि त्यातून मला दहा ते पंधरा हजार रुपये मिळाले. त्या दहा ते पंधरा हजार रुपयांतून मी गोळ्या बिस्कीटच्या दुकान सुरू केले. काही वेळ बकऱ्या चारायचं आणि त्यानंतर गोळ्या बिस्कीटचे दुकान हे चौकात लावून बसायचं असं करत करत माझा व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर मी गोळ्या बिस्कीटचा होलसेल व्यवसाय सुरू केला त्यातही वाढ झाली.

advertisement

त्यानंतर किराणा दुकान सुरू केले किराणा दुकान सुरू केले तेव्हा ते दुकान आठवडी बाजारात असल्याने त्यावर अतिक्रमण आले आणि त्यामुळे मला ते दुकान तिथून उचलावे लागले. ते दुकान कुठे सुरू करायचे? हा मोठा प्रश्न होता. जमा झालेल्या काही पैशांमध्ये मी गावांमध्ये जागा घेतली आणि तिथे माझा व्यवसाय सुरू केला.

बँकेकडून कर्ज घ्यायचे ते फेडायचे ते झालं की त्यातून नफा मिळायचा पुन्हा बँकेकडून कर्ज घ्यायचे व्यवसाय वाढवायचा, असे करत करत मी माझा व्यवसाय पुढे आणला. जेव्हा मला गरज होती तेव्हा सेंट्रल बँकेकडून मी तीन हजार रुपयाची कर्ज घेतले होते ते कर्ज घेत असताना बँकेने माझ्याकडून गहाणपत लिहून घेतली होती. त्यावर कितीतरी सह्या घेतल्या होत्या तीच बँक आज माझ्याकडे भाड्याने आहे. माझ्या किराणा दुकानाच्यावर सेंट्रल बँक आहे ती मला वीस हजार रुपये महिना असे रेंटपे करते.

मी व्यवसायात पुढे आलो याचे कारण म्हणजे व्यवसायात प्रामाणिकपणा ठेवला आणि जिद्द ठेवली. जवळ पैसा नसेल तरी फक्त तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल तर आपण व्यवसायात कितीही पुढे जाऊ शकतो आणि आपले क्रेडिट निर्माण केले की पैसा आपोआप येतो असा माझा अनुभव आहे, असे किराणा व्यवसायिक वासुदेवराव सुरजुसे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/मनी/
प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर केला किराणा व्यवसाय यशस्वी, आता वर्षाला 1 कोटींची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल