1) १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही.
2) अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल आम्ही तुम्हाला नंतर सांगू.
3)कर्करोगाची औषधे स्वस्त होतील
आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! पुढील आठवड्यात सादर होणार नवे इनकम टॅक्स विधेयक
4)ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.
advertisement
5)आयकर भरण्याची मर्यादा २ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येतील.
6)पुढील ६ वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
7)किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
8)बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
9)लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील.
10)एमएसएमईसाठी कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे; १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल.
11)स्टार्टअप्ससाठी कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले जाईल. हमी शुल्कातही कपात केली जाईल.