63 वर्ष जुना इनकम टॅक्सचा कायदा बदलणार; फायदा काय होणार? Budget मध्ये मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
New Income Tax Bill: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इनकम टॅक्स (आयकर) कायद्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय असेल नव्या कायद्यात आणि त्याचा फायदा काय होणार.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इनकम टॅक्स (आयकर) कायद्याची घोषणा केली आहे. या नवीन कायद्यामुळे आयकर नियम अधिक सोपे होतील, अनावश्यक तरतुदी काढून टाकल्या जातील आणि कायद्याची भाषा सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक समजण्यासारखी केली जाईल असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.
नव्या आयकर कायद्यात काय बदल होतील?
सरकारने 63 वर्षे जुन्या 1961 च्या आयकर कायद्याऐवजी नवीन कायदा दोन किंवा तीन भागांमध्ये लागू करावा का, यावर विचार सुरू आहे. ज्यामध्ये..
-करदात्यांसाठी नियम अधिक स्पष्ट आणि समजण्यासारखे केले जातील.
-जुन्या काळातील अव्यवहार्य आणि जटिल तरतुदी काढून टाकल्या जातील.
-कायदा जास्तीत जास्त लोकांना समजेल अशा पद्धतीने सादर केला जाईल.
advertisement
-नवीन कायदा तयार झाल्यानंतर, तो करदाते आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सुधारित केला जाईल.
सरकारचा महत्त्वाचा निर्णय
भारतातील गुंतागुंतीच्या कर प्रणालीवर टीका होत असताना, सरकारने आता हे स्पष्ट केले की नवा कर कायदा अधिक पारदर्शक आणि सुलभ केला जाईल.
advertisement
भारतातील आयकर कायद्याचा इतिहास
-भारतामध्ये पहिला आयकर कायदा 1860 मध्ये आला.
-तो ब्रिटिश अधिकारी सर जेम्स विल्सन यांनी 24 जुलै 1860 रोजी आणला, ज्याचा उद्देश 1857 च्या -उठावानंतरच्या सैन्य खर्चाची भरपाई करणे हा होता.
-सध्या भारतात 1961 चा इनकम टॅक्स अॅक्ट लागू आहे, जो 1 एप्रिल 1962 पासून प्रभावी झाला.
-या कायद्यात 298 कलमे आणि 14 अनुसूच्या आहेत, ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जातात.
advertisement
नवीन कायद्याचा प्रभाव
-करदात्यांना अधिक सोयीस्कर आणि समजण्याजोगा असेल
-सरकारला कर संकलन आणि प्रशासन अधिक सुलभ करता येईल.
-संशोधित कायद्यामुळे देशातील आर्थिक धोरणे अधिक प्रभावी होतील.
नवीन कर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार विधेयक सादर करेल आणि त्यावर संसदेत चर्चा होईल. या नव्या आयकर कायद्याकडून सर्वसामान्य करदात्यांना मोठ्या अपेक्षा असतील.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
February 01, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
63 वर्ष जुना इनकम टॅक्सचा कायदा बदलणार; फायदा काय होणार? Budget मध्ये मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय