Union Budget 2025 Highlights: शेतकरी ते मिडल क्लास कोणाला काय मिळाले? बजेट 2025मधील 11 महत्त्वाच्या घोषणा

Last Updated:

Union Budget 2025 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

News18
News18
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र सर्वात मोठी घोषणा ठरली ती नोकरदार वर्गासाठी होय. सीतारमन यांनी 12 लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागू होणार नाही असे जाहीर केले. यामुळे सर्व सामान्य लोकांकडे अधिक पैसे शिल्लक राहतील.
1) १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही.
2) अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल आम्ही तुम्हाला नंतर सांगू.
3)कर्करोगाची औषधे स्वस्त होतील
आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! पुढील आठवड्यात सादर होणार नवे इनकम टॅक्स विधेयक
4)ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.
advertisement
5)आयकर भरण्याची मर्यादा २ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येतील.
6)पुढील ६ वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
7)किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
8)बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.
advertisement
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
9)लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील.
10)एमएसएमईसाठी कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे; १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल.
11)स्टार्टअप्ससाठी कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले जाईल. हमी शुल्कातही कपात केली जाईल.
मराठी बातम्या/मनी/
Union Budget 2025 Highlights: शेतकरी ते मिडल क्लास कोणाला काय मिळाले? बजेट 2025मधील 11 महत्त्वाच्या घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement