TRENDING:

Crorepati Stocks: 10 हजाराचे झाले 19.17 कोटी, रिटर्न ऐकून गुंतवणूकदारही थक्क; करोडपती बनवणारे स्टॉक्सची यादी समोर आली

Last Updated:

Crorepati Stocks: दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद किती मोठी असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे CLSA ची ‘करोडपति शेअर्स’ यादी. या शेअर्सनी केवळ 28 वर्षांत 10,000 रुपये तब्बल 19 कोटी रुपयांपर्यंत वाढवून दाखवले आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: शेअर बाजारात मोठा पैसा तेच लोक कमावतात, जे धैर्य ठेवतात आणि दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) करतात. ब्रोकरेज फर्म CLSA चीकरोडपती शेअर्स’ यादी याचे उत्तम उदाहरण आहे. ब्रोकरेजने अशा दहा शेअर्सची माहिती दिली आहे, ज्यांनी केवळ 28 वर्षांत 10,000 रुपये हे 1.35 कोटी रुपयांपासून तब्बल 19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवले.

advertisement

CLSA च्या रिपोर्टनुसार हे शेअर्स 1,35,000% ते 19,00,000% पर्यंत उडाले आहेत. म्हणजेच 1,350 पट ते 19,000 पट इतका चकित करणारा परतावा दिला आहे. CLSA ने मजेत म्हटले कीजर आमच्याकडे टाइम मशीन असती, तर 1998 मध्ये आम्ही हे स्टॉक्स नक्की खरेदी केले असते. आजही या ‘करोडपती शेअर्स’ वर ब्रोकरेज हाउसचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे.

advertisement

Westlife Foodworks सर्वाधिक वाढलेला शेअर

Westlife Foodworks च्या शेअर्सने सर्वात जास्त परतावा दिला आहे.

1998 मध्ये किंमत: 0.03

सध्याची किंमत: 575

28 वर्षांत याने 19,17,039% रिटर्न दिला आहे.

advertisement

यामुळे 10,000 रुपयांचे 19.17 कोटी रुपये झाले आहेत.

Havells India आणि Eicher Motors: 28 वर्षांत प्रचंड वाढ

Havells India ने या कालावधीत 6,58,600% परतावा दिला आहे.

10,000 रुपयांचे 6.59 कोटी

advertisement

Eicher Motors ने मागील 28 वर्षांत 4,81,000% वाढ केली आहे.

10,000 रुपयांचे 4.81 कोटी

Bajaj Finance आणि Kotak Mahindra Bank: स्थिर पण प्रचंड कमाई

Bajaj Finance ने 28 वर्षांत 4,10,131% रिटर्न दिला आहे.Kotak Mahindra Bank ने याच काळात 2,37,303% वाढ केली आहे. या दोन्ही शेअर्सनी गुंतवणूकदारांची संपत्ती अनेकपट वाढवली आहे.

Samvardhana Motherson आणि Bharat Electronics: कोडपती बनवणारे शेअर्स

Samvardhana Motherson ने या कालावधीत 2,22,327% वाढ केली. Bharat Electronics (BEL) च्या शेअर्सने 1,65,600% वाढ केली. या दोन्ही कंपन्यांमध्ये 28 वर्षांपूर्वी 10,000 रुपये गुंतवले असते तर आज ते 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक झाले असते.

Titan Company आणि Shree Cement: सातत्याने वाढणारे शेअर्स

Titan Company ने 1998 पासून आतापर्यंत 1,47,119% परतावा दिला आहे. Shree Cement ने गेल्या 28 वर्षांत 1,43,957% रिटर्न दिला आहे.

Manappuram Finance गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर

Manappuram Finance ने या कालावधीत 1,35,225% वाढ केली आहे. 1998 मध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर आज ते गुंतवणूकदार करोडपती झाले असते.

मराठी बातम्या/मनी/
Crorepati Stocks: 10 हजाराचे झाले 19.17 कोटी, रिटर्न ऐकून गुंतवणूकदारही थक्क; करोडपती बनवणारे स्टॉक्सची यादी समोर आली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल