अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील प्रत्येक नागरिकावर 5 डॉलर ( 430 रुपये) कर्ज आहे. केवळ तीन महिन्यांत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात देशावरील कर्ज 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने गुंतवणुकदारांना केले मालामाल
अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचे परकीय कर्ज सप्टेंबर 2024 मध्ये वाढून 711.8 अब्ज डॉलर झाले आहे. हे जून 2024 च्या तुलनेत 4.3 टक्क्यांनी अधिक आहे. सप्टेंबर 2023 च्या शेवटी हे कर्ज 637.1 अब्ज डॉलर होते. "भारताचे तिमाही परकीय कर्ज" या शीर्षकाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर 2024 मध्ये परकीय कर्ज 711.8 अब्ज डॉलर होते, जे जून 2024 च्या तुलनेत 29.6 अब्ज डॉलर (सुमारे 2.52 लाख कोटी रुपये) अधिक आहे.
advertisement
हिंसाचाराबद्दल माफी मागतो, सर्वांनी माझ्या चुका माफ करा- मणिपूरचे मुख्यमंत्री
या अहवालानुसार सप्टेंबर 2024 मध्ये परकीय कर्ज आणि सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) यांचे प्रमाण 19.4 टक्के होते, जे जून 2024 मध्ये 18.8 टक्के होते. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या परकीय कर्जात अमेरिकन डॉलरचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 53.4 टक्के होते. त्यानंतर भारतीय रुपया (31.2 टक्के), जपानी येन (6.6 टक्के), एसडीआर (विशेष आहरण अधिकार) (5 टक्के), आणि युरो (3 टक्के) यांचा क्रमांक होता.
हिंसाचाराबद्दल माफी मागतो, सर्वांनी माझ्या चुका माफ करा- मणिपूरचे मुख्यमंत्री
प्रत्येक व्यक्तीवर किती कर्ज?
देशावर असलेल्या एकूण परकीय कर्जाच्या प्रमाणाचा विचार करता, भारतातील प्रत्येक व्यक्तीवर 5 डॉलर ( 430 रुपये) कर्ज आहे. सध्या देशाचे एकूण परकीय कर्ज 712 अब्ज डॉलर असून लोकसंख्या 1.40 अब्ज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकावर 5 डॉलरचे कर्ज आहे.
