Heritage Foods Ltd Share Price: मुख्यमंत्र्यांच्या मालकीची कंपनी; पद स्वीकारल्यापासून रॉकेट झाला शेअर, गुंतवणुकदार झाले मालामाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी नेता एन चंद्रबाबू नायडू हे देशाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टनंतर चंद्रबाबू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असल्याचे समोर आले होते. या रिपोर्टनुसार नायडू यांच्याकडे ९३१ कोटी इतकी संपत्ती आहे. या शिवाय चंद्रबाबू बद्दल अशी एक माहिती जी फार कमी लोकांना माहिती आहे त्याबद्दल जाणून घेऊयात..
चंद्रबाबू नायडू हे एका कंपनीचे संस्थापक आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेड असे नायडूंच्या कंपनीचे नाव आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये ०.३० टक्के तेजी आली आणि तो ४८४.१५ रुपयांवर बंद झाला. या कंपनीत चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबियांचा ३५.७१ टक्के इतका हिस्सा आहे.
हेडला अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणी धाडस करणार नाही;नवज्योतसिंग सिद्धू संतापले
या वर्षी ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यात नायडू यांच्या कंपनीने मोठा विजय मिळवला. हा विजय इतका महत्त्वाचा होता की केंद्रात मोदी सरकारला त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करता येत नव्हते. फक्त लोकसभा नाही तर विधानसभा निवडणुकीत नायडू यांच्या पक्षाने बाजी मारली. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. या दोन्ही घटनेनंतर चंद्रबाबूंच्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली.
advertisement
96 चेंडूत 170 धावा, टीम इंडियात आता तरी संधी मिळणार का? रोहितच्या जागेवर दावा
चंद्रबाबू मुख्यमंत्री झाल्यानंतर हेरिटेज फूड्स लिमिटेडचे शेअर्स रॉकेट सारखे झेपावले. २३ मे रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत ३५४.५० रुपये इतकी होती. त्यानंतर शेअर्समध्ये तेजी आली आणि १० जून रोजी तो ६९५ रुपयांवर गेला. त्यानंतर शेअर्समध्ये चढ-उतार होत आले.
advertisement
एका वर्षाचा विचार केला तर चंद्रबाबू नायडूंच्या या कंपनीने गुंतवणुकदारांना ५० टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. एक जानेवारी २०२४ रोजी शेअर्सची किंमत ३०४.३५ रुपये इतकी होती. आता तो ४८४.१५ रुपये इतका आहे. एका वर्षात या शेअर्सने ५९ टक्के रिटर्न दिला आहे. मात्र गेल्या ६ महिन्यांचा विचार केला तर हे शेअर्स १३.४४ टक्क्यांनी घसरेल आहेत.
advertisement
चंद्रबाबू नायडूंनी १९९२ साली या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी, रिटेल आणि एग्री आदी क्षेत्रात काम करते. नायडूंची कंपनी दूध, दही, ताक, पनीर, तूप आदी गोष्टींनी निर्मिती करून त्याची विक्री करते. दक्षिण भारतातील मार्केटवर या कंपनीची चांगली पकड आहे. त्याच बरोबर दिल्ली-एनसीआर, हरियाणा या राज्यात देखील उत्पादनांची विक्री केली जाते. कंपनीचे मार्केट कॅप ४.५० हजार कोटी इतके आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2024 5:50 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Heritage Foods Ltd Share Price: मुख्यमंत्र्यांच्या मालकीची कंपनी; पद स्वीकारल्यापासून रॉकेट झाला शेअर, गुंतवणुकदार झाले मालामाल


