Punish Travis Head: अशी शिक्षा द्या पुन्हा कोणी हिम्मत करणार नाही; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने 150 कोटी भारतीयांचा केला अपमान
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता तेव्हा ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल हे मैदानावर लढत होते. ऑस्ट्रेलियाचे सर्व जलद गोलंदाज थकले होते अशाच कर्णधार पॅट कमिन्सने पार्ट टायमर गोलंदाज ट्रेव्हिस हेडला गोलंदाीज दिली आणि त्याने पंतला बाद केले. पंत बाद होऊन पॅव्हेलियनला जात असताना हेडने जल्लोष करताना अपमानास्पद इशारा केला. ही गोष्ट कोणत्याही भारतीय व्यक्तीला आवडणारी नव्हती.
चौथ्या कसोटीतील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने यावर स्पष्टीकरण दिले. ही गोष्ट कधीच मान्य होणार नाही. आता या प्रकरणावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांनी एक्सवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. हेडचे हे वर्तन फक्त भारतीय नाही तर संपूर्ण क्रिकेटची मान शरमेने खाली घालवणार आहे. इतक नाही तर हा १५० कोटी भारतीयांचा अपमान आहे. ट्रेव्हिस हेडला शिक्षा देण्याची मागणी सिद्धू यांनी केली.
advertisement
अशी शिक्षा द्या पुन्हा कोणी हिम्मत करणार नाही
सिद्धू यांनी एक्सवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रेव्हिस हेडने गलिच्छ पद्धतीने केलेला जल्लोष हा क्रिकेटच्या जंटलमॅन गेमसाठी नाही. हे सर्वात चुकीचे उदाहरण आहे.जेव्हा मुलं, महिला, युवक आणि ज्येष्ठ खेळ पाहत असतात. अशा प्रकराची कृती एका व्यक्तीसाठी (ऋषभ पंत) 1.5 अब्ज भारतीयांचा आणि एका राष्ट्राचा अपमान आहे. त्याला कोठोर शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी उदाहरण ठरेल. आणि अशा प्रकारची कृती करण्याची कोणी हिम्मत करणार नाही.
advertisement
Travis head’s obnoxious behaviour during the course of the Melbourne test doesn’t auger well for for the gentleman’s game…… sets the worst possible example when there are kids, women , young & old watching the game……. this caustic conduct did not insult an individual but a…
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 30, 2024
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वादात सापडण्याची ट्रेव्हिस हेडची ही दुसरी वेळ आहे. याआधी तो मोहम्मद सिराजला भिडला होता. १४० धावांवर सिराजने त्याला बाद केले होते. तेव्हा तो सिराजकडे पाहून काही तरी म्हणाला होता. त्यावर सिराजने देखील प्रतिक्रिया दिली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2024 2:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Punish Travis Head: अशी शिक्षा द्या पुन्हा कोणी हिम्मत करणार नाही; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने 150 कोटी भारतीयांचा केला अपमान


