'सोनावणे वहिनी' फेम करण सोनावणे या स्पेशल व्यक्तीसाठी आलाय 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात, म्हणाला,"आता ट्रॉफी जिंकणारच"
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Karan Sonawane : 'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणे आईसाठी 'बिग बॉस मराठी 6'मध्ये सहभागी झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
करण सोनावणे म्हणतो,"माझी आई 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाची मोठी चाहती आहे. तू सोशल मीडियावर कन्टेंट करत असलास, तरी तू 'बिग बॉस'च्या घरात गेलास तरच खरा सेलिब्रिटी झालास, असं की म्हणायची. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि नवी संधी, माध्यम व नव्या प्रेक्षकांशी जोडून घेण्यासाठी मी या कार्यक्रमात जायचं ठरवलं".
advertisement
करण सोनावणे पुढे म्हणाला,"मला आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. पण ऑडिशनला गेल्यावर लोक हसतील म्हणून मी ते नेहमी टाळायचो. सिनेमे बघत मोठा झालो असल्याने कॅमेरा, फ्रेमिंगची माहिती होती. अभिनयाची आवड असल्याने युट्यूब चॅनल सुरु केलं. यशस्वीरित्या सोशल मीडियावर काम केल्यावर आता टीव्ही, सिनेमा या माध्यमातही झळकावं या उद्देशाने मी पुढची पावलं टाकत आहे".
advertisement
advertisement











