तारीख विसरू नका! 6 एप्रिलला 'या' राशींचं पालटणार नशीब, सूर्य-गुरूचा 'हा' दमदार योग ठरणार वरदान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली आणि त्यांच्यातील परस्पर दृष्टी योग मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतात. येत्या 6 एप्रिल 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवगुरू बृहस्पती यांच्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा योग निर्माण होत आहे.
advertisement
advertisement
मिथुन - रखडलेली कामे पूर्ण होणार: मिथुन राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत वरदान ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची महत्त्वाची कामे आता वेगाने पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूपच समाधानकारक असेल. कोणाकडे तरी अडकलेले तुमचे पैसे या काळात परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल.
advertisement
कन्या - व्यवसायात मोठा नफा आणि आरोग्य लाभ: कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य-गुरूचा हा संयोग सकारात्मक बदल घेऊन येईल. विशेषतः व्यापाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ असेल; व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तसेच, ज्यांना दीर्घकाळ आरोग्याच्या तक्रारी होत्या, त्यांना या काळात मोठा दिलासा मिळेल. वडिलांच्या आशीर्वादाने तुमची कामे यशस्वी होतील.
advertisement
धनु - करिअरमध्ये सुवर्णसंधी आणि पदोन्नती: धनु राशीचा स्वामी स्वतः गुरू आहे. केंद्र दृष्टी योगामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होऊन तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीची आनंदवार्ता मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांना गती मिळेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









