advertisement

रात्री 12 वाजता बर्थडेचा केक कापायला गेली अन् अचानक येऊ लागले आवाज! दृश्य पाहून मराठी अभिनेत्री शॉक, विश्वासच बसेना, VIDEO

Last Updated:

अभिनेत्री तिच्या बर्थडेचा केक समोर ठेवलेला पाहून ती खूप खुश झाली. पण ती केक कापणार इतक्यात अचानक बाहेरून मोठमोठ्याने आवाज येऊ लागले.

News18
News18
कलाकार मंडळी सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. नुकताच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या बर्थडे दिवशीचा आहे. रात्री 12 वाजता केक कापायला गेलेल्या अभिनेत्रीला अचानक बाहेरून असे आवाज आले की ती शॉकच झाली. काय घडतंय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, बाल्कनीमध्ये केक ठेवला आहे. अभिनेत्री घरातून बाहेर येते. समोर केक ठेवलेला पाहून ती खूप खुश होते. पण ती केक कापणार इतक्यात अचानक बाहेरून मोठमोठ्याने आवाज येऊ लागले. हे आवाज ऐकून ती थोडी घाबरली आणि पूर्णपणे शॉक झाली. काही क्षणांसाठी तिला विश्वासच बसत नव्हता की नेमकं काय घडत आहे.
advertisement
ही अभिनेत्री म्हणजेच अक्षय गुरव. केक कापायला आलेल्या अक्षयला काही सेकंदातच काय घडतंय हे कळलं नाही. तिच्यासाठी तिच्या जवळच्या व्यक्तींनी एक खास सरप्राईज प्लॅन केला होता. अक्षया गॅलरीत केक कापायला येताच बिल्डिंगखाली तिच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी फटाके फोडायला सुरुवात केली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Akshayaa♾️ (@akshayaagurav)



advertisement
जेव्हा तिला कळलं की हा सगळा सरप्राईज तिच्यासाठी आहे तेव्हा ती प्रचंड आनंदी झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य पाहण्यासारखं होतं. या खास क्षणानंतर अक्षया गुरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने पोस्टमध्ये लिहिलंय,  "मला शुभेच्छा देण्याऱ्या सगळ्यांचे आभार. त्यांचे स्पेशल आभार ज्यांनी मला हे कधीच विसरता न येणारं सरप्राइज दिलं." अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या या सरप्राईजबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
अक्षया गुरव ही मराठी मनोरंजन विश्वातील ओळखीचं नाव आहे. तिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'फुले', 'रानटी', 'श्यामची आई' यांसारख्या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. तसंच 'आई कुठे काय करते', 'राधा प्रेम रंगी रंगली' आणि 'लव्ह लग्न लोचा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
रात्री 12 वाजता बर्थडेचा केक कापायला गेली अन् अचानक येऊ लागले आवाज! दृश्य पाहून मराठी अभिनेत्री शॉक, विश्वासच बसेना, VIDEO
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement