कॅनरा बँक एफडी खात्यांवर 7.10 टक्के पर्यंत व्याज देते
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक सध्या त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या एफडी योजनांवर 3.25 टक्के ते 7.00 टक्के पर्यंत व्याजदर देते. किमान 7 दिवसांसाठी एफडी करता येते. कॅनरा बँकेत जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी एफडी अकाउंट उघडता येते. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक त्यांच्या 444 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सामान्य नागरिकांसाठी 6.50 टक्के, सीनिरय सिटीझन्ससाठी 7.00 टक्के आणि अति सुपर सीनियर सिटीझन्ससाठी 7.10 टक्के व्याजदर देत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एफडी योजनेअंतर्गत, तुम्हाला ठराविक कालावधीनंतर निश्चित रक्कम व्याज मिळते, ज्यामध्ये कोणताही चढ-उतार होत नाही.
advertisement
फ्रॉड झाल्यावर Sanchar Saathi App वर कशी करावी तक्रार? ही आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
कॅनरा बँक 5 वर्षांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याज देतेय
कॅनरा बँक सध्या सामान्य नागरिकांसाठी 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के व्याज देते. तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि कॅनरा बँकेत 5 वर्षांच्या एफडीमध्ये 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,72,708 रुपये मिळतील, ज्यामध्ये 72,708 रुपये फिक्स्ड व्याज समाविष्ट आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि कॅनरा बँकेत 5 वर्षांच्या एफडीमध्ये 2 लाख रुपये जमा केले असतील, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,79,500 रुपये मिळतील, ज्यामध्ये 79,500 रुपयांचे फिक्स्ड व्याज समाविष्ट आहे.
₹6000 नी स्वस्त झाला Vivo चा धमाकेदार फोन! कॅमेरा, बॅटरी सर्वच भारी
Disclaimer: वरील माहिती केवळ माहितीच्या उद्देशानी दिली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या फायदा किंवा तोट्यासाठी न्यूज 18 जबाबदार राहणार नाही.
