TRENDING:

EPFO New Rules 2025: नव्या वर्षात तुमचा फायदाच फायदा होणार; PF खात्यासाठी नवीन नियम जाणून घ्या

Last Updated:
advertisement
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organisation - EPFO)ने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत. हे बदल नवीन वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्ती निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी अनेक नवीन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
News18
News18
advertisement

या नव्या नियमांचा उद्देश PF खातेधारकांना (PF account holders) अधिक सुविधा देण्यासह त्यांना आपल्या निवृत्ती निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करण्याचा आहे. या बदलांमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच सरकारी कर्मचारी यांना फायदा होईल. जाणून घ्या नव्या नियमांबद्दल...

प्राजक्ता माळीने थेट देवेंद्र फडणवीस फोन केला

PF खात्यासाठी 5 नवीन नियम (EPFO New Rules 2025):

advertisement

ATM द्वारे PF पैसे काढण्याची सुविधा

EPFO ने सदस्यांना अधिक सुविधा देण्यासाठी ATM कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खातेधारकांना कधीही पैसे काढता येतील. ईपीएफओची ATMमधून पैसे काढण्याची सुविधा पुढील वर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू झाल्यानंतर सदस्य कधीही 24 तासांमध्ये सहजपणे पैसे काढू शकतील. यामुळे सदस्यांचा बराच वेळ वाचेल. सध्या PFचे पैसे बँक खात्यात मिळण्यासाठी त्यांना 7 ते 10 दिवस वाट पाहावी लागते.

advertisement

टाटा समूह देणार नव्या ५ लाख नोकऱ्या, या क्षेत्रात आहे सर्वाधिक संधी

कर्मचाऱ्यांच्या योगदान मर्यादेत बदल

आगामी वर्षात EPF योगदान मर्यादेत बदल करण्याचा सरकार विचार करत आहे. सध्या कर्मचारी आपल्या मूळ पगाराचा 12% EPF खात्यात योगदान देतात. मात्र सरकार कर्मचारीांना 15,000 रुपयांच्या मर्यादेऐवजी प्रत्यक्षात त्यांच्या पगाराच्या आधारावर योगदान देण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. यामुळे कर्मचारी त्यांच्या निवृत्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी जमा करू शकतील आणि दरमहा अधिक पेन्शन मिळवू शकतील.

advertisement

EPFO सिस्टम अपडेट

EPFO आपली आयटी सिस्टम अपडेट करत आहे. ज्यामुळे PF क्लेम करणाऱ्या सदस्यांना त्यांची रक्कम काढणे अधिक सोपे होणार आहे. सिस्टम अपडेट करण्याचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.आयटी सिस्टम अपडेट झाल्यावर क्लेम जलद आणि पारदर्शकपणे निपटवले जातील. तसेच फसवणुकीचे प्रकार कमी होतील.

मद्य सेवन करणारे आघाडीचे १० देश, भारताचा क्रमांक कितवा?

advertisement

इक्विटीमध्ये गुंतवणुकीची सुविधा

EPFO आपल्या सदस्यांना इक्विटीमध्ये गुंतवणुकीची परवानगी देण्याचा विचार करत आहे. यामुळे PF खातेधारकांना आपला निधी अधिक प्रभावी पद्धतीने व्यवस्थापित करण्याचा पर्याय मिळेल. जर सेवानिवृत्ती निधी संघटना थेट इक्विटी गुंतवणुकीस मान्यता देते, तर सदस्यांना उच्च परताव्याची अपेक्षा करता येईल.

पेन्शन काढण्यात सोय

EPFO पेन्शनधारकांसाठी मोठा बदल करत आहे. नव्या नियमांनुसार पेन्शनधारक व्हेरिफिकेशनशिवाय देशातील कोणत्याही बँकेतून आपली पेन्शन काढू शकतील. या निर्णयामुळे सदस्यांना खूप सुविधा होईल, तसेच त्यांचा बराच वेळ वाचेल.

मराठी बातम्या/मनी/
EPFO New Rules 2025: नव्या वर्षात तुमचा फायदाच फायदा होणार; PF खात्यासाठी नवीन नियम जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल