Prajakta Mali Latest News: प्राजक्ता माळीने थेट देवेंद्र फडणवीस फोन केला; CM म्हणाले, 'अशा प्रकारचा नॉनसेन्स मी...'
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
मुंबई: आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने आज पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रजाक्ताने पत्रकार परिषदेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. कोणतेही आधार नसताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे गंभीर असल्याचे तिने सांगितले.
या संदर्भात आपण स्वत:कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि आजच महिला आयोगाकडे तक्रार देखील केल्याचे प्राजक्ताने सांगितले. तसेच आज सकाळीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेण्यासाठी फोन केला होता. फोनवर आमचे बोलने देखील झाले. त्यांनी देखील मला हेच सांगितले की, अशा प्रकारचे नॉनसेन्स मी कधीच मान्य करणार नाही. मी तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखणार नाही. तुम्ही जा आणि पत्रकार परिषद घ्या. याबाबत मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललो आहे. अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कोणीच मान्य करून घेणार नाही. मी प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे प्राजक्ता म्हणाली.
advertisement
सुरेश धस, तुम्ही सर्व महिलांचा अपमान केला; माझी माफी मागा- प्राजक्ता माळी
अशा प्रकरणात एखादी व्यक्ती माफी मागते आणि पुढे जाते. पण अशा प्रकारची घटना या पुढे कधीच होऊ नये यासाठी कारवाई झाली पाहिजे असे तिने सांगितले.
advertisement
महिला आयोगाकडे केली तक्रार...
view commentsया प्रकरणी आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या गोष्टीवर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी कायदे आणि नियम झाले पाहिजेत अशी मागणी आपण महिला आयोगाकडे केल्याचे प्राजक्ता म्हणाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2024 6:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Prajakta Mali Latest News: प्राजक्ता माळीने थेट देवेंद्र फडणवीस फोन केला; CM म्हणाले, 'अशा प्रकारचा नॉनसेन्स मी...'


