टाटा समूहाची मोठी घोषणा: देणार ५ लाख नव्या नोकऱ्या, जाणून घ्या कोणाला आहे संधी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
नवी दिल्ली: टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी नुकतेच कंपनीच्या वेबसाइटवर वर्षअखेरचा संदेश शेअर केला आहे. या संदेशामध्ये त्यांनी रतन टाटांना आदरांजली वाहिली असून कंपनीत पुढील पाच वर्षांत ५ लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय जाहीर केले आहे.
टाटा समूहाच्या अध्यक्षांनी वर्षभरातील भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या मानवी संकटांचा उल्लेख केला. युक्रेन, गाझा, आणि सुदानमधील चालू असलेल्या लष्करी संघर्षांबद्दल चर्चा केली व त्यांच्या जागतिक पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांचा चंद्रशेखरन यांनी भाष्य केले.
रतन टाटा यांना आदरांजली
रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांची नीतिमत्ता, दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारांनी आमच्या व्यवसायाला एका संपूर्ण पिढीसाठी आकार दिला. आमच्या समूहाने एक आदर्श आणि नेता गमावला आहे. आणि मी माझा प्रिय मार्गदर्शक आणि मित्र गमावला आहे.
advertisement
पाच लाख नवीन नोकऱ्यांचे ध्येय
टाटा समूह भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून चंद्रशेखरन यांनी आरोग्यसेवा आणि गतिशीलतेमध्ये एआय-आधारित प्रगतीने संपूर्ण मानवजातीला मदत होईल. पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षेत्रात ५ लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचा कंपनीचा मानस आहे.
advertisement
प्रमुख क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण
view commentsसेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, सौर उपकरणे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये या नोकऱ्या निर्माण होतील.याशिवाय किरकोळ व्यवसाय, तंत्रज्ञान सेवा,विमान सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्र यांसारख्या क्षेत्रांमध्येही अनेक सेवा नोकऱ्या दिल्या जातील,असे त्यांनी जाहीर केले. यावेळी चंद्रशेखरन यांनी नव्या वर्षाबद्दल आशावाद व्यक्त केला. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारताच्या लोकसंख्येतील युवकांची ताकद आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उत्पादन क्षेत्र महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2024 6:56 PM IST


