मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर लोक अचानक नोटा खरेदी करू लागले, १ रुपयाच्या नोटेसाठी इतके रुपये देण्यास तयार

Last Updated:
News18
News18
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. अर्थ सचिव, आरबीआयचे गव्हर्नर, अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा देशाच्या विकासावर मोठा आणि दिर्घकाळ परिणाम राहिला. मनमोहन सिंग हे देशाचे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांची स्वाक्षरी नोटांवर आहे.
डॉ.मनमोहन सिंग हे १९७६ साली अर्थ सचिव होते आणि या पदावर असल्याने एक रुपयाच्या नोटेवर त्यांची स्वाक्षरी आहे. डॉ.सिंग १६ सप्टेंबर १९८२ ते १४ जानेवारी १९८५ या काळात RBIचे गव्हर्नर होते. एक रुपया वगळता अन्य सर्व नोटांवर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर लोकांनी अचानक त्यांची स्वाक्षरी असलेल्या नोटा विकत घेण्यास सुरुवात केली.
advertisement
डॉ.मनमोहन सिंग किती कोटींची संपत्ती मागे ठेवून गेले
दुर्मिळ आणि संग्राह्य वस्तू विकणाऱ्या ऑनलाइन मार्केटप्लेस असलेल्या BidCurios वर डॉ. सिंग यांची स्वाक्षरी असलेली १०० रुपयांची नोट आउट ऑफ स्टॉक झाली होती. १०० रुपयांच्या या नोटेसाठी ३०० रुपये मोजले जात होते. त्याच प्रमाणे त्यांची स्वाक्षरी असलेली १ रुपयांची नोट ३०० रुपयांना मिळत होती. मात्र ही नोट देखील फार कमी प्रमाणात उपलब्ध होती.
advertisement
मोदी सरकारचे मध्यमवर्गीयांना सर्वात मोठे गिफ्ट, अर्थसंकल्पात मिळणार गुड न्यूज
१९७८ साली वित्त सचिव म्हणून एक रुपयाच्या नोटेवर डॉ. सिंग यांची स्वाक्षरी आहे. त्यांची सही असलेल्या १६ नोटांचा एक सेट १२ हजार ५०० रुपयांना उपलब्ध होता. यात १ रुपयाच्या ५ नोटा, २ रुपयांच्या ३ नोटा, ५ रुपयाच्या २ नोटा, १० रुपायाच्या ३ नोटा तसेच २०, ५० आणि १०० रुपयांच्या प्रत्येकी एक नोटेचा समावेश होता.
advertisement
डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून देशाची सूत्रे अशा वेळी हाती घेतली होती जेव्हा भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. देशाने सोने गहाण ठेवले होते. आयातीसाठी फक्त २ आठवडा पुरेल इतके परकिय चलन उपलब्ध होते. अशात सिंग यांनी जुलै १९९१ साली ऐतिहासिक असा अर्थसंकल्प सादर केला ज्यामुळे देशाच्या विकासाची दिशाच बदलली. आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून या प्रवासाची सुरूवात सिंग यांनी केली होती.
view comments
मराठी बातम्या/मनी/
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर लोक अचानक नोटा खरेदी करू लागले, १ रुपयाच्या नोटेसाठी इतके रुपये देण्यास तयार
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement