VIDEO : 'छोट्या चिकू'ला पाहून कोहलीच आश्चर्यचकीत, थेट रोहित शर्मासमोरच उभं केलं आणि...पुढे काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा उद्या सौराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीसारख्या दिसणाऱ्या एका 'छोट्या चिकू' प्रचंड चर्चा रंगली आहे
Virat Kohli Lookalike Kid Garvit Uttam : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा उद्या सौराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीसारख्या दिसणाऱ्या एका 'छोट्या
चिकू' प्रचंड चर्चा रंगली आहे.या छोट्या चिकूला पाहून विराट कोहलीला देखील आश्चर्यचकीत झाला होता. त्यामुळे हा छोटा चिकू नेमका कोण आहे? आणि त्याला पाहून विराटची रिअॅक्सन काय होती? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली जसा त्याच्या लहानपणी दिसायचा, तसाच हुबेहूब दिसणाऱ्या या चिमुकल्याने नाव हे गर्वित उत्तम आहे. त्याचे वय 8 वर्ष आहे. तो हरियाणाच्या पंचकुला परिसरात राहतो. सध्या विराट कोहलीसोबतचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
advertisement
खरं तर एका जाहिरातीची शुंटीग दरम्यान विराट कोहली आणि या छोट्या चिमुकल्याची भेट झाली होती.यावेळी या गर्वित उत्तमला पाहून विराट देखील शॉक झाला होता. दरम्यान आता विराट सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या गर्वित उत्तमने एका मुलाखतीत विराट कोहलीसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Virat Kohli told Rohit Sharma that there’s a duplicate of him. 😂❤️pic.twitter.com/01NScXztvd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 13, 2026
advertisement
विराट कोहलीमधली तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते? असा प्रश्न गर्वितला मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर गर्वित म्हणाला त्यांची स्टाईल आणि ऑरा. पुढे विराट कोहलीसोबतच्या भेटीबाबत गर्वित म्हणाला की, मी एकदाच त्यांचं (कोहली) नाव घेतलं.त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले मी थोड्या वेळात येतो, असे सांगून तो निघून गेला.
advertisement
त्यानंतर गर्वित म्हणाला की, विराट कोहलीने त्याला पाहून रोहित शर्माला सांगितले की तिकडे माझा ड्युप्लिकेट बसला आहे.त्यानंतर त्यांनी मला 'छोटा चिकू' म्हटलं. तसेच मी वडोदरा मॅचमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा,अर्शदिप सिंह आणि केएल राहुललाही भेटलो.
कोण आहे छोटा चिकू?
गर्वित उत्तमचे कुटुंब मूळचे कुरुक्षेत्राचे आहे, परंतु गेल्या 10 वर्षांपासून तो हरियाणातील पंचकुला येथील सेक्टर 11मध्ये राहत आहे. गर्वितचे वडील सुरेंद्र सिंग हिमाचल प्रदेशातील एका औषध कंपनीत वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करतात.
advertisement
पंचकुला येथील रहिवासी असलेला 8 वर्षीय गर्वित उत्तम सेक्टर 11 मधील सीएल चॅम्प क्रिकेट अकादमीमध्ये नियमितपणे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक संजय शर्मा गेल्या दोन वर्षांपासून त्याला मार्गदर्शन करत आहेत, तर त्याचा मोठा भाऊ मयंक उत्तम गेल्या पाच वर्षांपासून त्याला खेळाचे बारकावे शिकवत आहेत. गर्वित तिसऱ्या वर्गात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 5:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'छोट्या चिकू'ला पाहून कोहलीच आश्चर्यचकीत, थेट रोहित शर्मासमोरच उभं केलं आणि...पुढे काय घडलं?









