'हमाली करतो, या पोरामध्ये काय आहे', लोकांनी नाव ठेवली; नवऱ्याला BBM 6मध्ये पाहून रोशन भजनकरच्या पत्नी अश्रू अनावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Roshan Bhajankar Wife Video : दिवसभर हमालीची काम करून, रात्री जीम आणि त्यातून स्वत: ची बॉडी बनवणारा रोशन भजनकरची स्टोरी खूप प्रेरणादायी आहे. रोशनच्या आतापर्यंतच्या यशामागे त्याच्या बायकोचा महत्त्वाचा वाटा आहे.
प्रेम केलं की ते निभवावंही लागतं. त्या प्रेमात तर जोडीदाराची खंबीर साथ आणि विश्वास मिळाला तर ते प्रेम सक्सेस होतं. प्रेमात संघर्ष, विश्वास, भांडणं, चढ-उतार येतच असतात. मात्र या सगळ्यांवर मात करून एकमेकांची साथ देतात ते खरं प्रेम असतं असं म्हणतात. असंच काहीस घडलंय बिग बॉस मराठी 6 मध्ये आलेल्या देसी बिल्डरबरोबर. अमरावतीचा बॉडिबिल्डर रोशन भजनकरनं नुकतीच बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याच्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
दिवसभर हमालीची काम करून, रात्री जीम आणि त्यातून स्वत: ची बॉडी बनवणारा रोशन भजनकरची स्टोरी खूप प्रेरणादायी आहे. रोशनच्या आतापर्यंतच्या यशामागे त्याच्या बायकोचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याची बायको सीमा भजनकर हिचा रोशनवर ठाम विश्वास आणि साथ त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप महत्त्वाची ठरली आहे. नवऱ्याला बिग बॉसच्या घरात जाताना पाहून सीमाला अश्रू अनावर झालेत.
advertisement
ज्या लोकांनी सीमा आणि रोशन यांच्या नात्याला, रोशनच्या कामाला नावं ठेवली त्या सगळ्यांना दोघांनी मिळून हे दाखवून दिलं की प्रेमात जी ताकद असते ती दुसऱ्या कशातच नसते. रोशनला बिग बॉसच्या स्क्रिनवर पाहून सीमाने तिच्या मनातल्या भावना पहिल्यांदा बोलून दाखवल्या.
advertisement
सीमा भजनकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांच्या गावात बिग बॉसचा पहिला एपिसोड मोठ्या पडद्यावर पाहिला गेला. तेव्हा रोशनला पाहून तिला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, तिच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "आज मला खूप खुशी होत आहे. जेव्ही मी लग्न करत होते तेव्हा मला सर्वजण बोलत होते की, या पोराच्या घरी काय आहे? हमाली काय करतो पोरगा. सीमा पुढे जाऊन काही नाही होणार."
advertisement
"मी मनाशी जिद्द ठेवली होती. लग्न करायचं असेल तर याच मुलाशी करणार. मी स्वतः कामाला जाईन, संसार सांभाळेन आणि त्यालाही साथ देईन. पण ते मला म्हणाले की सीमा तुला कामाला जाण्याची काहीच गरज नाही", असंही सीमा म्हणाली.
advertisement
हमालीसारखं कष्टाचं काम करूनही रोशनने कधीही पत्नीला कमीपणाची जाणीव होऊ दिली नाही. आज रोशन आणि सीमा यांना तीन मुलं आहेत. ते त्यांचं नवं घर बांधत आहेत. त्यांच्या नव्या घराचं बांधकाम सुरू आहे. बिग बॉस मराठी 6 च्या घरात रोशनची ही संघर्षमय कहाणी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणारी ठरणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हमाली करतो, या पोरामध्ये काय आहे', लोकांनी नाव ठेवली; नवऱ्याला BBM 6मध्ये पाहून रोशन भजनकरच्या पत्नी अश्रू अनावर









